

राजापूर : पेंडखळे भवानी मंदिर येथे (राजापूर) मंगळवारी सायंकाळी 4च्या सुमारास विजेच्या खांबावर काम करत असताना अचानक विजेच्या तीव्र धक्क्याने तिथवली येथील वायरमन अनिकेत परवडी याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
तो 27 वर्षांचा होता. ऑपरेटरकडून वीज वाहिनी बंद करून तो दुरुस्तीसाठी खांबावर चढला होता. मात्र विजेच्या तीव्र धक्क्याने तो खाली पडला व त्याचा मृत्यू झाला. त्याचे पार्थिव सायंकाळी सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. या अपघाताने हळहळ व्यक्त होत आहे.