Rajapur Mega Projects Status 2026 - राजापुरातील 'त्या' प्रकल्पांचे काय होणार?

जैतापूर अणुऊर्जा, नाणार-बारसू रिफायनरी तसेच नाटे आंबोळगडचा आयलॉग प्रकल्प
Rajapur Mega Projects Status 2026
Rajapur Mega Projects Status 2026file photo
Published on
Updated on

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका नाव उच्चारताच विकासाच्या गगनचुंबी स्वप्नांची आणि संघर्षाच्या धगधगत्या वास्तवाची एकाचवेळी आठवण होते, दोन दशके औद्योगिक आणि ऊर्जा प्रकल्पांच्या घोषणा, करार, बैठका आणि आश्वासनांच्या ढगांनी मोठा गडगडाट केला; पण प्रत्यक्षात विकासाचे एक टिपूसदेखील गाळले नाही, अशी खंत आज सर्वसामान्यांच्या मनात दाटून आली आहे. त्यामुळे तालुक्यात आलेल्या या तीन प्रकल्पांचे नेमके होणार तरी काय? या प्रश्नाचे उत्तर आज प्रत्येक जण शोधत आहे.

एकीकडे जैतापूर संबंधित काही प्रकल्पग्रस्तांनी नुकसानभरपाई स्वीकारून वास्तवाशी तडजोड केली, तर दुसरीकडे मच्छीमार आणि शेतकरी बांधवांनी आपल्या अस्तित्वाच्या लढाईत अजूनही झेंडा खाली ठेवलेला नाही. "जगायचं कसं?" हा साधा प्रश्नच आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला आणि स्थानिक विरोधाची धार दिल्लीपर्यंत पोहोचली. दरम्यान, सत्तांतरांच्या वायांनीही या प्रकल्पांच्या दिशेला कलाटणी दिली. २०१४ नंतर केंद्रात बदललेल्या सत्तेसोबत जैतापूर प्रकल्प जणू गोठल्यासारखा धमिला, तर नाणार प्रकल्प बारसूकडे वळवण्यात आला. पण ठिकाण बदललं, तरी संर्षाचा ज्वालामुखी शांत झाला नाही ही अधिकच भडकला.

Rajapur Mega Projects Status 2026
Maharashtra Teachers Salary: मोठी बातमी! ई-केवायसी नसल्यास शिक्षकांना नाही मिळणार एप्रिलचा पगार

घोषणांचा गजर आणि अंमलबजावणीचा शून्य परिणाम यामधील बाढती दरी आता जनतेच्या संयमाची कसोटी पाहत आहे. 'आलेले हे प्रकल्प खरच मार्गी लागणार आहेत का?' की 'फक्त राजकीय पटावरची प्यादी ठरणार?' हा सवाल प्रत्येक राजापूरकराच्या ओठांवर ठाण मांडून बसला आहे. स्थानिक पातळीवरही मतमतांतरे तीव्र आहेत काहींना रोजगार आणि विकासाची आस, तर काहींना पर्यावरण व उपजीविकेची भीती.

Rajapur Mega Projects Status 2026
Ratnagiri Crime News | राजापुरात महिलेवर अत्याचार, संशयित शिक्षकाला अटक

या दोन टोकांच्या दरम्यान राजापूरचा सामान्य माणूस मात्र संभ्रमाच्या बादलात अडकलेला दिसतो. आव प्रश्न एकच दोन दशकांच्या संघांचा शेवट कधी? विकासाच्या नावाखाली पेटलेली ही आग विझवून, पर्यावरणपूरक आणि रोजगारनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांचा नवा मार्ग शासन दाखवणार का? की राजापूरची माती अजुनही आश्वासनांच्या राखेतच झाकली जाणार? कोकणवासीयांच्या डोळपात आता एकच अपेक्षा दाटून आली आहे 'निर्णय हवा तोही ठाम, स्पष्ट आणि जनतेच्या हिताचा.

धगधगत्या संघर्षाला काळी किनार...

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प असो, नाणार-बारसू रिफायनरी असो किंवा नाटे-आंबोळगडचा आयलॉग प्रकल्प प्रत्येक प्रकल्पाने राजापूच्या मातीत आशेची पालवी फुलवली; पण त्याचवेळी संघर्षाची ठिणगीही पेटवली. 'विकास' या गोंडस शब्दाच्या आड दडलेला पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्न उघड होताच, स्थानिकांच्या आक्रोशाने आंदोलनांचे रूप घेतले. दगडफेक, अश्रुधूर, आणि अगदी गोळीबारापर्यंत गेलेल्या घटनांनी या संघर्षाला काळी किनार दिली. तबरेज सायेकर यांचा मृत्यू हा त्या धगधगत्या संघांचा जिवंत जखमेप्रमाणे आन्सी स्मरणात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news