राजापूर: अणुस्कुरा-ओणी मार्गावर कार झाडाला धडकली: उत्तर प्रदेशातील महिलेचा मृत्यू

राजापूर: अणुस्कुरा-ओणी मार्गावर कार झाडाला धडकली: उत्तर प्रदेशातील महिलेचा मृत्यू

राजापूर, पुढारी वृत्तसेवा :  उत्तरप्रदेशवरुन पुण्याला एका विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या आणि पुण्यावरून गोव्याला फिरायला जाणाऱ्या चौरसिया कुटुंबियांच्या गाडीला अणुस्कुरा – ओणी मार्गावरील  येळवण बागवेवाडी दरम्यान अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात  शुक्रवारी (दि.५) सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान झाला.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश येथील चौरसिया कुटुंब काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमाला उत्तरप्रदेशहून पुण्याला आले होते. त्या ठिकाणचा कार्यक्रम आटोपून गोव्याला फिरायला निघाले होते. पुण्यावरून ओणी, विटा महामार्गाने अणुस्कुरा- पाचल- ओणी असा प्रवास करीत होते.

या दरम्यान ते सकाळी येळवण बागवे येथे आले असता त्यांच्या कारचा (युपी ५३ डीएम८०९०) अपघात झाला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता सोडून रस्त्यालगतच्या जुनाट झाडाला आदळली.  गाडीत एकूण पाच प्रवाशी होते. यापैकी राजरानी चौरसिया (वय ६८) यांचा जागीच मृत्यू झाला. कार त्यांचा मोठा मुलगा शक्ती राजाराम चौरासिया (वय २६, रा. पुणे) चालवत होते. ते किरकोळ जखमी झाले आहेत. तर संजयकुमार चौरासिया (वय ४७) जखमी झाले आहेत. सरिता संजय कुमार चौरासिया (वय ४२)  किरकोळ जखमी तर एक चार वर्षाची मुलगी किमाया चौरासिया कारमध्ये होती.

तर त्यांच्या सोबत अजून एक चार चाकी वाहनातुन त्यांचीच दुसरी फॅमिली त्यात एकूण पाच प्रवाशी प्रवास करीत होते. त्यात मयत राजरानी चौरासिया यांचा दुसरा छोटा मुलगा तसेच मुलगी व मुलीची फॅमिली असे एकूण पाच जण  प्रवास करीत होते. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसून ते सर्व सुखरूप आहेत. मृत महिलेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे शवविच्छेदनसाठी आणला.

या अपघातानंतर  रायपाटण पोलीस ठाण्याचे पो. कॉ. निलेश कात्रे, पो. कॉ. स्वप्नील घाडगे, पो. कॉ. भीम कोळी तसेच दक्षता कमिटी राजापूरच्या धनश्री मोरे तात्काळ घटनास्थळी पोहोचल्या. राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झाले. पुढील तपास राजापूरचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे करीत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news