Digital Attendance: शाळांची हजेरी आता पूर्णपणे ऑनलाईन

शिक्षण संचालनालयाच्या शाळांना सूचना : व्हीएसके प्रणालीवर उपस्थिती नोंदवणे बंधनकारक
Digital Attendance
Digital Attendance: शाळांची हजेरी आता पूर्णपणे ऑनलाईनPudhari File Photo
Published on
Updated on

रत्नागिरी : सर्व शाळांमध्ये आता विद्यार्थी आणि शिक्षकांची हजेरी विद्या समीक्षा केंद्र (व्हीएसके) प्रणालीवरच नोंदवावी लागणार आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शाळांना विस्तृत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. डिजिटल पद्धतीने उपस्थिती नोंदवण्याचा निर्णय यावर्षीपासूनच लागू केला आहे.

केंद्र शासनाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून व्हीएसके प्रणाली राज्यभर लागू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीवर थेट नियंत्रण ठेवणे, वास्तविक उपस्थितीचे विश्लेषण करणे आणि शाळा पातळीवरील प्रशासकीय पारदर्शकता वाढवणे या उद्दिष्टासाठी ही प्रणाली सक्षम ठरणार असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.

आता राज्यातील सर्व शाळांनी ऑफलाईन पद्धतीला पूर्णविराम देत ऑनलाईन हजेरी प्रणाली स्वीकारण्याची तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संचालनालयाने एक परिपत्रक काढत नव्या सूचनांनुसार प्रत्येक शाळेने व्हीएसके प्रणालींचा दैनंदिन वापर करुन विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची उपस्थिती नोंदवणे बंधनकारक आहे.

उपस्थिती नोंदीत कोणतीही तांत्रिक त्रुटी किंवा विलंब होऊ नये यासाठी शिक्षकांनी गुगल प्ले स्टोअरवरील महास्टुडंट अ‍ॅप हे अधिकृत अ‍ॅप डाऊनलोड करुन त्यावर शाळेचा यूडायस क्रमांक व प्राथमिक माहिती नोंदवावी असे कळवण्यात आले आहे. अ‍ॅपमध्ये शाळेची माहिती प्रदर्शित झाल्यानंतर ती अचूक असल्याची खातरजमा करुन पुढील टप्पा पूर्ण करावयाचा आहे.

त्यानंतर संबधित वर्ग शिक्षकांनी स्वतः चा शालार्थ आयडी प्रविष्ट करुन शालार्थातील माहिती योग्य असल्याची पडताळणी करणे आवश्यक असल्याचेही या परिपत्रकात म्हटले आहे. शाळांमधील हजेरी नोंदीची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी केंद्रप्रमुखांनी दररोज आढावा घेणे बंधनकारक असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.

Digital Attendance
Ratnagiri News : राजापुरात डझनभर बंडखोरांचे आव्हान

विद्यार्थी उपस्थितीबाबत सूचना

विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवताना विद्यार्थी उपस्थिती या टॅबवर क्लिक करुन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उपस्थिती, अनुपस्थितीची नोंद करायची आहे. एका शिक्षकाकडे एकापेक्षा जास्त इयत्ताची जबाबदारी असल्यास प्रत्येक वर्गासाठी ही प्रक्रिया स्वतंत्रपणे करावी लागेल. उपस्थिती माहिती नोंदवल्यानंतर अंतिम दाखल करा. या पर्यायावर क्लिक करून ती सबमिट करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक किंवा प्रभारी मुख्याध्यापकांसाठी अ‍ॅपमध्ये स्वतंत्र शिक्षक उपस्थिती मॉड्यूल असून, त्याद्वारे सर्व शिक्षकांची हजेरी चिन्हांकीत करावी लागणार आहे.

Digital Attendance
Ratnagiri News : गर्डरचे काम रखडले; वाहनचालक त्रस्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news