Ratnagiri ZP Election| विवाहापूर्वी मतदानाचा साधला मुहूर्त; जामगेतील नववधूने जपली लोकशाहीची परंपरा

खेड तालुक्यातील जामगे येथे नववधू रेश्माचे लग्नाआधी केले मतदान
ZP Panchayat Samiti Election Khed
विवाहाचा मुहूर्त गाठण्यापूर्वी रेश्माने आपल्या नागरिक कर्तव्याला प्राधान्य देत मतदानाचा मुहूर्त साधलाPudhari
Published on
Updated on

ZP Panchayat Samiti Election Khed

खेड : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत खेड तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मतदानाचा उत्साह दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील जामगे गावात लोकशाहीप्रती कर्तव्यभावना जपणारा एक प्रेरणादायी प्रसंग घडला.

जामगे येथील नरळकर कुटुंबातील वधू रेश्मा हिचा आज दापोली तालुक्यातील माटवण येथील विवेक याच्यासोबत विवाह सोहळा पार पडणार आहे. मात्र, विवाहाचा मुहूर्त गाठण्यापूर्वी रेश्माने आपल्या नागरिक कर्तव्याला प्राधान्य देत मतदानाचा मुहूर्त साधला.

ZP Panchayat Samiti Election Khed
Ratnagiri News : सफाई कामगारांवरुन सेना-भाजपात नाराजीनाट्य

लग्नाची लगबग, विधी आणि वेळेची मर्यादा असूनही रेश्मा हिने वऱ्हाडासह थेट जामगे जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र गाठले. तेथे रेश्माने आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली. नववधूच्या या कृतीकडे पाहण्यासाठी मतदार, मतदान कर्मचारी तसेच गावकरीही थांबले होते. अनेकांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

“विवाह हा आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो, पण मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आणि कर्तव्य आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. नव वधूने दिलेल्या या संदेशामुळे तरुण पिढीमध्ये मतदानाबाबत सकारात्मक जागृती निर्माण होत असून, ‘आधी मतदान, मगच इतर कामे’ हा लोकशाहीचा खरा मंत्र अधोरेखित झाला आहे.

ZP Panchayat Samiti Election Khed
Ratnagiri News : चिपळूणमध्ये 1 लाख 83 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

जामगे गावातील हा प्रसंग निवडणूक प्रक्रियेत एक आदर्श उदाहरण ठरत असून, मतदारांनी कोणत्याही कारणामुळे मतदानापासून दूर राहू नये, याची जाणीव करून देणारा ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news