

Mumbai-Goa Highway Firing Rumor
खेड : तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावरील खोपीफाटा परिसरात गोळीबार झाल्याची खोटी माहिती ११२ क्रमांकावर देणाऱ्या केतन प्रमोद साळवी (रा. मिर्ले) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन भोयर यांनी दिली.
२४ मे रोजी संध्याकाळी मुंबई-गोवा महामार्गावर गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, कोणताही गोळीबार झाल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे खोटी माहिती देऊन जनतेत घबराट निर्माण केल्याबद्दल आणि पोलीस यंत्रणेचा वेळ वाया घालवल्याबद्दल संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे.