

Mumbai Goa Highway Firing
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वेरळ येथील खोपी फाटा परिसरात शनिवारी (दि.२४) रोजी दुपारी धक्कादायक घटना घडली आहे. दोन अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून एका मोटारीचा पाठलाग करत एका कारला थांबवले आणि सुरवातीला तिच्या काचा फोडत नंतर हवेत गोळीबार केला. ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कारमधील व्यक्ती यावेळी कार घटनास्थळी सोडून पळून गेल्याने तिचा जीव बचावला. घटनेनंतर खेड पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी संशयित तरुणांना शोधण्याचे काम सुरू केले आहे. पोलिस महामार्ग परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासत असून पोलिसांनी लवकरात लवकर संशयित आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.