Mukhyamantri Matsya Sampada Yojana fisheries boost| मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेतून मच्छीमारांना आर्थिक बळ

आधुनिक तंत्रज्ञान, मत्स्य प्रक्रिया व विपणन सुविधांच्या विकासाला प्रोत्साहन; मत्स्य व्यवसायाला मिळणार नवी दिशा
Mukhyamantri Matsya Sampada Yojana fisheries boost| मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेतून मच्छीमारांना आर्थिक बळ
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला अरबी समुद्रालगत सुमारे १६७ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली असून, या किनारपट्टीवरील हजारो मच्छीमार कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार असलेल्या मत्स्यव्यवसायाला आता आधुनिकतेची जोड मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेतून मत्स्य उत्पादनवाढ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, मत्स्य प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन सुविधांच्या विकासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी आणि राजापूर हे तालुके किनारपट्टीशी जोडलेले आहेत. हर्णे, दाभोळ, जयगड, भाट्ये-मिरकरवाडा, पूर्णगड, राजापूर आणि बाणकोट ही महत्त्वाची मासेमारी केंद्रे आहेत. समृद्ध सागरी जैवविविधता आणि पारंपरिक मासेमारीचा वारसा लाभलेल्या या जिल्ह्यात बदलते हवामान, सुरक्षित मासेमारी, शीतसाखळी, मत्स्य उत्पादनाचे मूल्यवर्धन आणि शाश्वत सागरी संसाधन व्यवस्थापन या बार्बीना महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

या योजनेतून मच्छीमार, मत्स्यशेतकरी, महिला बचत गट, मत्स्य सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO/FPC), युवक आणि मत्स्य उद्योजकांना पात्रतेनुसार लाभ घेता येणार आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, मत्स्यपालन, समुद्री शेवाळ संवर्धन, मत्स्यबीज उत्पादन, मत्स्य प्रक्रिया व मूल्यवर्धन, विपणन, शीतसाखळी आणि मत्स्य पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. योजनेत राज्यस्तरावरील तसेच जिल्हास्तरीय घटकांचा समावेश आहे.

विभागीय स्तरावर प्रशिक्षण केंद्रांची स्थापना, आंतरराज्य अभ्यास दौरे, मत्स्य बाजारपेठांची उभारणी, निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धनासाठी आधुनिक पद्धतींचा वापर, समुद्री शेवाळ बीज निर्मिती केंद्रांची उभारणी तसेच मासळी उतरविण्याची केंद्रे आणि बंदरांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय योजनांमध्ये यांत्रिक व बिगर यांत्रिक नौकांवरील अनुदान, मत्स्य सहकारी संस्थांचा विकास आणि मत्स्यबीज केंद्रांचे बांधकाम, दुरुस्ती व आधुनिकीकरण अशा घटकांचा समावेश आहे.

Mukhyamantri Matsya Sampada Yojana fisheries boost| मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेतून मच्छीमारांना आर्थिक बळ
Ratnagiri | स्वच्छतेत रत्नागिरी किनारपट्टी देशात तिसरी!

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रेयोजनेचा लाभ घेण्यासाठी NFDP नोंदणीचा पुरावा, ओळखीचा पुरावा, निवासाचा पुरावा, बँक खात्याचा तपशील, मत्स्यव्यवसायाशी संबंधित कागदपत्रे आणि प्रकल्प अहवाल (DPR) आवश्यक आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी नोंदणी व अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी कार्यालयाशी संपर्क साधावा. 'समृद्ध मत्स्यव्यवसाय, सक्षम मच्छीमार आणि विकसित महाराष्ट्र' हे उद्दिष्ट ठेवून राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे किनारपट्टीवरील मच्छीमारांचे उत्पन्न वाढवणे, युवक व महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि रत्नागिरी जिल्ह्यात शाश्वत मत्स्यव्यवसायाला बळकटी देण्याचा प्रयत्न आहे.

Mukhyamantri Matsya Sampada Yojana fisheries boost| मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेतून मच्छीमारांना आर्थिक बळ
Ratnagiri Airport| रत्नागिरी विमानतळाच्या विकासाला १०.६७ कोटींचे बळ!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.