

राजापूर : अवकाळी पावसामध्ये जवळेथर परिसरात वीज पडून दोन कामगार जखमी झाल्यी घटना शुकवारी दुपारी सव्वा तीन वाजता घडली आहे. जखमींना उपारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. पकाश अंबाजी मोरे (५२), विलास शिवाजी धावडे (४३) अशी जखमी झालेल्यीं नावे आहेत.
शुकवारी दुपारनंतर जवळथेर परिसरात वीजांच्या कडकडाटासह पावसाचा शिडकाव झाला. दरम्यान पकाश मोरे व विलास धावडे हे गावात बांधकाम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळल्याने ते दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही जवळेथर पाथमिक आरोग्य केंद्रात उपारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर पशासन तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होत.