Raghuveer Ghat | रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली, वाहतूक ठप्प, विद्यार्थ्यांसह प्रवासी अडकले

Ratnagiri News | चार दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Raghuveer Ghat Landslide
अकल्पे येथून खेडकडे येणारी एसटी बस घाटातच अडकून पडली(Pudhari Photo)
Published on
Updated on

Raghuveer Ghat Landslide

खेड : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी (दि.२) मध्यरात्री पुन्हा एकदा दरड कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. चार दिवसांत हा दुसरा प्रकार घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (दि.३) सकाळी अकल्पे येथून खेडकडे येणारी एसटी बस घाटातच अडकून पडली. या बसमध्ये खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत जाणारे विद्यार्थीही होते. या विद्यार्थ्यांना तब्बल तीन तास बसमध्ये अडकून राहावे लागले.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून दरड हटवण्याचे काम सुरू केले. अकराच्या सुमारास दरड हटवण्यात आल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

Raghuveer Ghat Landslide
Ratnagiri : भाडेवाढीमुळे रत्नागिरी आगारास दीड कोटीचे उत्पन्न

दरड हटविल्यानंतर सकाळी ८.३० वाजता खेडमध्ये पोहोचण्याची अपेक्षा असलेली बस तब्बल तीन तास उशिराने, म्हणजे ११.३० वाजता खेड बसस्थानकात पोहोचली, अशी माहिती खेड आगाराचे व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी दिली.

रघुवीर घाटात वारंवार दरड कोसळण्याच्या घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. प्रशासनाने या भागातील सुरक्षेची अधिक प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

Raghuveer Ghat Landslide
Ratnagiri ZP News | इस्रो-नासा दौरा विद्यार्थी की अधिकार्‍यांसाठी?; पालकमंत्र्यांनी रत्नागिरी जि.प.मधील अधिकार्‍यांची घेतली ’शाळा‘

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news