Khed Ratnagiri Road Accident | भरधाव डंपरची रिक्षाला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, रिक्षाचालक गंभीर जखमी

Khed Ratnagiri Road Accident | तालुक्यातील भरणे-खेड मार्गावर ३० रोजी सायं ४ वा.च्या सुमारास भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला.
Raigad Accident
Raigad Accident
Published on
Updated on

खेड : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील भरणे-खेड मार्गावर ३० रोजी सायं ४ वा.च्या सुमारास भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्त्तीचा जागीच मृत्यू झाला असून, रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील भिलारे आयनी येथील संतोष भिलारे हा त्यांच्या ताब्यातील रिक्षा (एमएच ०८ एक्यू ८७८४) घेऊन भरणे येथून खेडच्या दिशेने जात होते.

Raigad Accident
Nashik Division 11th Admission | नाशिक विभागात अकरावीच्या 17,910 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

त्यांच्या रिक्षाने आठवडा बाजार परिसर गाठला असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात रिक्षाचालक संतोष भिलारे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तसेच अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, ती व्यक्ती रिक्षामध्ये प्रवास करत होती की रिक्षा थांबवण्यासाठी हात दाखवत असताना तिला अपघातग्रस्त वाहनांचा धक्का बसला हे समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करून जखमी रिक्षाचालकाला कळंबणी रुग्णालयात दाखल केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news