Natunagar Dam Canal | नातूनगर धरणातून कालव्यात सोडलेले पाणी जातेय वाया

Natunagar Dam Canal | शेतीसाठी सोडलेले पाणी पावसाळी नाल्यात! भडगाव कालव्याच्या दुरवस्थेमुळे नातूनगर धरणाचा पाणीसाठा धोक्यात
Dam Canal
Natunagar Dam Canal | नातूनगर धरणातून कालव्यात सोडलेले पाणी जातेय वायाPudhari Photo
Published on
Updated on

खेड : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील नातूनगर धरण जिथे बारमाही पाणी साठा आहे, त्या धरणाच्या भडगाव बाजूच्या कालव्याला गळती लागल्याची शंका व्यक्त होत आहे. स्थानिक शेतकरी आणि नागरिकांच्या निदर्शनानुसार, उन्हाळी शेतीसाठी सोडण्यात आलेले पाणी कालव्यातून बाहेर पडून रस्त्यांच्या बाजूच्या पावसाळी नाल्यातून वाहत आहे.

Dam Canal
Rajapur Commercial Gas Cylinder | राजापुरात व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा बंद

या प्रकारामुळे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, धरणातील पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे पाणी फक्त काही ठिकाणी टिकते, तर काही बाजूंच्या कालव्यांमधून ते वाया जाते. एका बाजूला कोकणाचा सिंचनाचा अनुशेष भरून निघताना दिसत नाही, तर दुसऱ्या बाजूला पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे, असे ते म्हणाले. स्थानिक प्रशासनाला आणि सिंचन विभागाला या गळतीची तातडीने दुरुस्ती करण्याची आणि पाण्याचा योग्य वापर सुनिश्चित करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. उन्हाळी हंगामात पाण्याची कमतरता भासते, असे पाहता पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब वाचवणे अत्यंत गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news