Lote Industrial Area Protest 2026 | 'लक्ष्मी ऑरगॅनिक' विरोधी आंदोलन अधिक तीव्र

Lote Industrial Area Protest 2026 | ११ ग्रा.पं.ची कंपनी बंद करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
Lote Industrial Area Protest 2026
Lote Industrial Area Protest 2026
Published on
Updated on

खेड : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनी विरोधातील आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. परिसरातील ११ ग्रामपंचायतींनी ठराव करून कंपनी बंद करण्याची मागणी मान्य केली असून, यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल व पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे.

Lote Industrial Area Protest 2026
Ashok Kharat Nashik SIT Investigation | अशोक खरात प्रकरणाचा तपास आता 'SIT' कडे! आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करणार छडा

लोटे, चिरणी, आंबडस, भेलसई, सोनगाव कालुस्ते बुद्रूक, घाणेखुंट, आवाशी, गुणदे, शेल्डी या ग्रामपंचायतींनी मिळून लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती नावाने ४५ नागरिकांची समिती गठित केली आहे.

या समितीने प्रशासनासमोर स्थानिक नागरिकांच्या भावना मांडल्या आणि कंपनीमुळे होणाऱ्या पर्यावरणीय व सामाजिक परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली. या बैठकीत आंदोलनाचे प्रमुख प्रतिनिधी रवींद्र हरिश्चंद्र गोवळकर, संजय आंब्रे, संजय साळवे, अविनाश आंब्रे, किशोर आंब्रे, उदय घाग, सुबोध सावंत देसाई आदी उपस्थित होते.

Lote Industrial Area Protest 2026
Goa State Bar Council Election 2026 | गोवा बार कौन्सिल निवडणुकीत मोठा ट्विस्ट! निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती कायदेशीर लढाईनंतर रद्द

आंदोलकांनी ठामपणे सांगितले की, कंपनी बंद होईपर्यंत संविधानिक व लोकशाही मागनि लढा सुरू ठेवला जाईल. स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या या विरोधामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून, आगामी काळात या आंदोलनाची दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आंदोलनाला चालना दिल्याचे मुख्य कारण म्हणजे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी पिफास या घातक रसायनाचे उत्पादन करत असल्याचे आरोप आहेत. यामुळे कोकण नागरी संघर्ष समितीमार्फत कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन सुरू आहे आणि अकरा ग्रामपंचायतींच्या या पाठिंब्यामुळे आंदोलन अधिक बळकट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news