Ganeshotsav 2026 | जपानी पर्यटकही भारावला जैतापूरच्या गणेशोत्सवाने; भक्तिमय वातावरण, परंपरा अन् आपुलकीचे केले कौतुक

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता स्थानिक संस्कृती, परंपरा आणि माणुसकीचा संदेश जगभर पोहोचविणारा उत्सव
 Japanese Tourist visit Jaitapur Ganesh Festival
जपानी पर्यटक मसारु ईवाई यांनी गणेशोत्सव, धार्मिक परंपरा आणि उत्सवाच्या आयोजनाबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.Pudhari
Published on
Updated on

Japanese Tourist visit Jaitapur Ganesh Festival

राजापूर : जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला जपानहून आलेल्या पर्यटकाने आवर्जून उपस्थिती लावत जैतापूरच्या गणेशोत्सवातील भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना सुरू असतानाचे दृश्य पाहून भारावलेल्या या पर्यटकाने मूर्तीचे फोटो तसेच व्हिडिओ आपल्या कॅमेर्‍यात टिपले.

मसारु ईवाई असे या जपानी पर्यटकाचे नाव असून ते टोकियो, जपानचे नागरिक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून आपण या परिसरात येत असून, यंदा प्रथमच जैतापूरमधील गणेशोत्सव प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी गणेशोत्सव, येथील धार्मिक परंपरा आणि उत्सवाच्या आयोजनाबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली.

 Japanese Tourist visit Jaitapur Ganesh Festival
Ratnagiri ST Bus | कोकणकरांच्या परतीच्या प्रवासासाठी 'लालपरी' सज्ज; रत्नागिरीतून 2500 जादा बसेसचे नियोजन

जैतापूरमधील गणेशोत्सवाची परंपरा, नागरिकांचा उत्साह आणि स्थानिक संस्कृतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच जैतापूरकरांच्या आपुलकीच्या वागणुकीनेही ते प्रभावित झाले. शहर आणि गावातील नागरिकांच्या वागणुकीत फरक जाणवतो. गावातील माणसे अधिक प्रेमळ, मनमिळावू आणि आपुलकीने वागतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. जैतापूरकरांनी दिलेल्या या प्रेमळ वागणुकीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

परदेशातून आलेल्या पाहुण्याने जैतापूरच्या गणेशोत्सवाचा अनुभव घेत स्थानिक श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि माणुसकीचे कौतुक केल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता स्थानिक संस्कृती, परंपरा आणि माणुसकीचा संदेश जगभर पोहोचविणारा उत्सव ठरत आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 Japanese Tourist visit Jaitapur Ganesh Festival
Ratnagiri News : जिल्‍ह्यात यावर्षी गतवर्षीपेक्षा सरासरी ८५० मि.मी. कमी पाऊस!

यावेळी जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, पत्रकार राजन लाड, खजिनदार श्रीकृष्ण राऊत, सचिव सुनील करगुटकर, मनीष करगुटकर, महेश नारकर, रेशम लाड, राजेंद्रप्रसाद राऊत यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मंडळाच्या वतीने जपानहून आलेल्या पर्यटकाचे औचित्यपूर्ण स्वागत करून सन्मान करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news