Lote MIDC Gas Leak : लोटे एमआयडीसीतील एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती

अनेकांना श्वसनाचा त्रास; चौघेजण उपचारासाठी रुग्णालयात दाखल
gas leak
लोटे एमआयडीसीतील एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती
अनुज जोशी

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये एक दुर्घटना झाली आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोटे औद्योगिक वसाहतीमधील एक्सेल कंपनीमध्ये प्रक्रिया सुरू असताना रसायन गळती झाली. त्याचा पावसाच्या पाण्यामध्ये संपर्क झाला. परिणामी तयार झालेल्या वायू नजीकच्या लोटे चाळकेवाडीमध्ये पसरल्याने काही जणांना या वायूची बाधा झाली.

पाच ते सात जणांना सर्दी डोकेदुखी असा त्रास होऊ लागल्याने त्यांना घरडा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता व्यवस्थापक आनंद पाटणकर यांनी सांगितले की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून ज्यांना वायूची बाधा झाली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर लोटे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एक्सल कंपनीसमोर ठिय्या करत कंपनी व्यवस्थापनाला या दुर्घटनेस जबाबदार धरले. कंपनीवर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news