Ganpatipule Temple Dress Code | गणपतीपुळे मंदिरात नववर्षापासून 'ड्रेस कोड'! तोकड्या कपड्यांना दर्शनासाठी पूर्ण बंदी!

Ganpatipule Temple Dress Code | 1 जानेवारी 2027 पासून वस्त्रसंहितेची काटेकोर अंमलबजावणी; परिसरात जनजागृतीपर फलक
Ganpatipule Temple Dress Code
Ganpatipule Temple Dress Code file photo
Published on
Updated on

गणपतीपुळे : पुढारी वृत्तसेवा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात आता भाविकांना भारतीय परंपरेला साजेशी वेषभूषा करूनच दर्शनाला प्रवेश मिळणार आहे. संस्थान श्री देव गणपतीपुळेच्या पंच समितीने १ जानेवारी २०२७ पासून मंदिरात 'ड्रेस कोड' बंधनकारक करण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. त्या बाबतचे जनजागृतीपर फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत.

Ganpatipule Temple Dress Code
Ganpatipule Beach : पालकमंत्र्यांच्या आदेशाने गणपतीपुळे बीच खुला

संस्थानकडून यापूर्वीही वस्त्रसंहितेबाबत भाविकांना सूचना देण्यात आल्या होत्या. आता १ जानेवारीपासून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मंदिर हे सर्वांचे श्रद्धास्थान असल्याने दर्शनासाठी येताना भारतीय परंपरेला साजेशी व सभ्य वेषभूषा परिधान करावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील पेहराव मंदिरात नको!

गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने समुद्रकिनारी फिरण्यासाठी येणारे पर्यटक मंदिरातही दर्शनासाठी जातात. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर जाण्यासाठीचा पेहराव मंदिरात परिधान करून येऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे. कमी कपड्यांचा पोशाख, गुडघ्याच्या वर येणारे स्कर्ट किंवा ड्रेसेस तसेच असभ्य भाषा अथवा आक्षेपार्ह चित्रे असलेले कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करता येणार नाही.

अशा वेषभूषेतील भाविकांना दर्शनासाठी प्रवेश नाकारला जाईल. यासाठी मंदिर प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये, असेही सूचनाफलकावर स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, १० वर्षांखालील मुलांना वस्त्रसंहितेच्या नियमातून सूट देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news