Ratnagiri Rajwadi Ancient Hindu Caves-राजवाडीत सापडली पाच प्राचीन हिंदू लेणी

Archaeological Discovery-लेण्यांना स्थानिक लोक 'आडिवरेच्या महाकालीचे विश्रांतीस्थान' म्हणून ओळखतात
Ancient Hindu Caves
Ancient Hindu Caves found Rajwadi Ratnagiri pudhari photo
Published on
Updated on

Ancient Hindu Caves found Rajwadi Ratnagiri

राजापूर : तालुक्यातील राजवाडी ते वाडीखुर्द परिसरात पाच कातळकोरीव प्राचीन हिंदू लेणी आढळून आल्याने इतिहासप्रेमी व अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या लेण्यांना स्थानिक लोक 'आडिवरेच्या महाकालीचे विश्रांतीस्थान' म्हणून ओळखले जाते.

Ancient Hindu Caves
Chiplun Skeleton Mystery| नरबळी की घातपात? 'त्या' जळक्या सांगाड्याचे गूढ उलगडणार!

सागरी महामार्गापासून काही अंतरावर जामसंडेच्या जंगल भागात काजू बागेजवळ एका कातळकड्यात एका रांगेत तीन हिंदू लेणी कोरलेली आढळतात. या लेण्यांची उंची सुमारे ४ ते ५ फूट असून आतमध्ये पादपीठ व शिवलिंग स्थापनेसाठी गोलाकार खोबण दिसून येते. त्यामुळे ही लेणी शैव पंथाशी संबंधित असलचे स्पष्ट होते, याच परिसरात पुढे घनदाट जंगलातून आणि ओढा पार केल्यानंतर आणखी दोन लेणी सापडतात. यापैकी एक लहान असून दुसरे लेणे अधिक मोठे व रेखीव आहे. या मोठ्या लेण्यात गर्भगृह व सभामंडप असल्याचे दिसून आले असून अधिष्ठान आणि त्यावर लिंग स्थापनेसाठी खोबण स्पष्टपणे दिसते.

या लेण्यांच्या शोधासाठी २४ मार्च रोजी पत्रकार व इतिहास अभ्यासक विनोद पवार आणि शिलालेख वाचक अनिल दुधाने व पराग पारकर यांनी प्रत्यक्ष स्थळभेट दिली. स्थानिकांच्या मदतीने ही लेणी शोधण्यात आली. परिसर अतिशय दाट जंगलाने व्यापलेला असल्याने ही लेणी आजपर्यंत दुर्लक्षित राहिल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे या परिसरात जांभ्या दगडात खोदलेली एक प्राचीन विहीरही आढळली असून आसपास पाण्याचा अभाव असतानाही ती पाण्याने भरलेली आहे. यावरून प्राचीन जलव्यवस्थापनाची कल्पकता अधोरेखित होते.

Ancient Hindu Caves
Dapoli Diesel Theft | बसमधील डिझेल चोरीचा पर्दाफाश, चोरट्यास रंगेहाथ पकडले

राजापूर तालुक्यात यापूर्वीही कोदवली, पांगरे, सोगमवाडी, रावाचे गोठणे, सागवे व मिठगवाणे येथे अशाचप्रकारची एकाश्म मंदिरे व लेणी आढळून आली आहेत. त्यामुळे ही सर्व स्थळे एकाच कालखंडातील असावीत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या लेण्यांचा सखोल पुरातत्त्वीय अभ्यास करून त्यांचे संवर्धन करण्याची मागणी आता स्थानिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news