Dapoli Diesel Theft | बसमधील डिझेल चोरीचा पर्दाफाश, चोरट्यास रंगेहाथ पकडले

बसमधील डिझेलचोरीचा पर्दाफाश, चोरट्यास रंगेहाथ पकडले; गावठी बंदुकीसह जिवंत काडतुसेही जप्त
Dapoli Diesel Theft
dapoli diesel theft file photo
Published on
Updated on

dapoli diesel theft news

दापोली : तालुक्यातील भडवळे येथे एस.टी. बसमधून डिझेल चोरी करताना एका चोरट्यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याकडून बेकायदेशीर गावठी बंदूक व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, गौतम मनोहर रुखे (रा. दयाळ रुखेवाडी, फुरुस, ता. खेड) हा त्याच्या वॅगनर (एमएच ०१ डीआर ३४५१) वाहनातून भडवळे येथे आला होता. तेथे मुक्कामी असलेल्या दापोली-भडवळे एस.टी. बस (एमएच २० बीएल १५३५) च्या डिझेल टँकचे झाकण उघडून पाईपच्या सहाय्याने डिझेल कॅनमध्ये काढत असताना तो रंगेहाथ सापडला. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यात विनापरवाना १२ बोअर सिंगल नळीची गावठी बनावटी बंदूक व जिवंत काडतुसे आढळून आली.

Dapoli Diesel Theft
Matheran Water Shortage: माथेरानमध्ये पाणी कपात सुरू; पर्यटन हंगामाआधी जल प्राधिकरण सतर्क

या घटनेबाबत एस. टी. वाहक निवृत्ती सखाराम पवार (३९, रा. दापोली आगार) यांनी फिर्याद दिली असून दापोली पोलिस ठाण्यात ३० मार्च रोजी सकाळी १०.२५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अभिजित पवार करीत आहेत. दापोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली. मात्र दापोली आगारातील एकही अधिकारी त्याठिकाणी उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले.

Dapoli Diesel Theft
Rajapur Gram Panchayat | राजापूरचा गावगाडा तापणार! 15 ग्रामपंचायतींच्या 21 जागांसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news