

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील इंदापूर, रातवड, विठ्ठलवाडी, तळवली, कोलाड, पुई, पुगांव, खांब, सुकेळी, वाकण अशा विविध ठिकाणी येथील रस्त्याची दिशा बदलतांना दिशादर्शक फलका जवळ मोठ-मोठे खड्डे पडलेले असून या खड्डयांमुळे वाहनचालकांसह प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यामुळे संबंधित ठेकेदार यांनी दिशादर्शक फलकाजवळील खड्डे भरावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गांवरील एका बाजुकडून दुसर्या बाजूकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत परंतु ज्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणच्या रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट बनली असून या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. शिवाय या खड्डयांमुळे रस्ता खाली-वर झाला आहे. यामुळे वाहनांची एका बाजूचे टायर खड्ड्यात तर दुसर्या बाजूचे टायरवर होत असून वाहने पलटी होतांना दिसत आहेत.
चार दिवसापूर्वी नम्रता हॉटेल पुगांव येथील दिशादर्शक फलकाजवळून जाणारी विको गाडी या खड्ड्यातून जात असताना वाहन चालकांनी ब्रेक लावल्याने ही गाडी पलटी होऊन गाडीच्या चारही चाकावर झाल्या सुदैवाने दैव बलवान म्हणून कोणतेही जिवीत हानी झाली नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत, त्या त्या ठिकाणच्या रस्त्याची परिस्थिती बिकट झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली 17 वर्षांपासून सुरु असून हा मार्ग पूर्ण होण्यासाठी लोकनेत्यांकडून फक्त तारीख पे तारीख देण्यात आल्या परंतु या महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही आता या महामार्गाची डिसेंबर 2024 ची डेडलाईन देण्यात आली असून गणपतीनंतर ठिकठिकाणी या मार्गाचे काम वेगाने सुरु आहे असे चित्र पहावयास मिळत आहे परंतु असे असले तर संबंधित ठेकेदारदारांनी एका बाजुकडून दुसर्या बाजूकडे जाणार्या रस्त्याचे काम पहिले चांगल्या प्रकारे केले पाहिजे होते.
परंतु कोणत्याही दिशादर्शक फलकाजवळून जाणार्या रस्त्याचे काम हे निकृष्ठ दर्जाचे आहे. यामुळे कोणाचा नाहक बळी गेला तर याला जबाबदार संबंधित ठेकेदार कारणीभूत असेल असे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.