

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडमळा येथे रस्त्यातच उभ्या असलेल्या डंपरला दुसर्या एका डंपरने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अमित एकनाथ हुमणे (30, रा. आगवे) यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.7) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला. अमित हुमणे हे महावितरणमध्ये वायरमन म्हणून कार्यरत होते.
या प्रकरणी शौकतअली या डम्पर चालकावर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश हुमणे हे त्यांच्या ताब्यातील डम्पर आगवे ते चिपळूण असे चालवित होते. यावेळी महामार्गावरील कोंडमळा येथे एका वळणावर शौकत अली याने डाव्या बाजूच्या लेनवर धोकादायक स्थितीत डम्पर उभा केला होता.
या डंपरला मागून येणार्या डम्परची जोरदार धडक बसली. यावेळी धडक देणार्या डम्परमध्ये क्लिनर बाजूकडे बसलेले अमित हुमणे यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला तर सुरेश हुमणे हे जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.7) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
अमित हुमणे हे महावितरणमध्ये कार्यरत होते. त्यांनी महावितरणच्या कबड्डी संघात चुणूक दाखवून एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून सन्मान मिळविला होता. या शिवाय महावितरणच्या कबड्डी संघाचे कर्णधारपद भूषविले होते. त्यांच्या निधनामुळे महावितरण कर्मचार्यांसह आगवेमध्ये शोक व्यक्त होत आहे.