

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीतून दररोज हजारो ते लाखो प्रवासी प्रवास करत असतात. यामध्ये काहीजण गर्दीचा फायदा घेऊन विनातिकीट प्रवास करत असतात. यावर काहीजणांवर कारवाई होते तर कित्येक जण वर्षांनुवर्षे तसेच प्रवास करत आहेत. मात्र आता प्रवाशांनो सावधान एसटीत विनातिकीट प्रवास केल्यास महागात पडणार आहे. आर्थिक दंडाबरोबरच अजामीनपत्र गुन्हा दाखल होणार आहे. तसेच चालक-वाहकास मारहाण केल्यास बीएनएस कलम 233-333 नुसार किमान 3 ते 4 कारावस, गुन्हा दाखल होणार आहे.
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य घेऊन परिवहन महामंडळ काम करते. लाडक्या लालपरीतून दररोज हजारो, लाखो प्रवासी प्रवास करत असतात. वाट पाहीन मात्र लालपरीतूनच प्रवास करीन यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुसरीकडे वाढत्या गर्दीचा फायदा घेऊन काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. महामंडळाकडून वर्षातून काहीवेळा तपासणी होते यामध्ये काही प्रवाशांवर कारवाई होते. मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थेच होते. त्यामुळे आता विनातिकीट प्रवास करणाऱ्यावर चाप बसवण्यासाठी महामंडळाकडून नियम कडक करण्यात आले आहे. विनातिकीट प्रवास केल्यास आर्थिक दंड करण्यात येणार तसेच एसटीची आर्थिक फसवणूक व शासकीय कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल वाहक प्रवाशावर पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करून अजामीनपत्र व 2 ते 5 वर्षे तुरुंगवास होणार आहे. चालक-वाहकास मारहाण केल्यास किमान 3 ते 4 वर्षे कारावास, गुन्हा दाखल होणार आहे. बसचे नुकसान करणे, खंडणी मागणे, चालक-वाहकांशी हुज्जत घातल्यास अशांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनो नियमांचे पालन करावे अन्यथा गुन्हा दाखल अन गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.