Ratnagiri School | आता जिल्हा परिषद शाळांना मिळणार हायटेक सुविधा

Ratnagiri School | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेतून मिळणार पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण
ZP Smart Schools
ZP Smart SchoolsPudhari
Published on
Updated on

रत्नागिरी : जाकीरहुसेन

पिरजादे ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढावी या उद्देशाने राज्य सरकारने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ८ जिल्ह्यांतून ४१२ शाळांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील ८ शाळांची निवड झाली आहे. या शाळांतून पहिली ते दहावीपर्यंत दर्जेदार शिक्षण दिले जाणार असून तेथे स्मार्ट क्लाससारख्या हायटेक सुविधा देण्यात येणार आहेत.

ZP Smart Schools
Ponda Murder Case | फोंडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! खाजोर्डा खून प्रकरणातील मुख्य आरोपीला 24 तासांत बेड्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा दर्जा सुधारून त्या आदर्श शाळा बनवणे या उद्देशाने ही योजना ५ मार्च २०२१ रोजी सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ४८८ शाळा निवडल्या होत्या. त्यातील कामे अंतिम टप्प्यात आहेत. दुसरा टप्पा नुकताच जाहीर झाला.

असून ४१२ शाळांची निवड करण्यात आली आहे. पूर्वी या योजनेचे नाव आदर्श शाळा योजना होते, त्यानंतर आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना असे नाव देण्यात आले. या योजनेतून विविध जिल्ह्यांतील काही मोजक्या शाळांची निवडी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर शाळांची गुणवत्ता वाढावी, खासगी शाळांशी स्पर्धा करण्यास सक्षम बनवणे या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना राबविण्यास सुरूवात केली आहे.

ZP Smart Schools
Child Mortality Control | बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्य आणि जिल्हा स्तरावर 'लसीकरण कृती दल' स्थापन

ग्रामीण, सामाजिकदृष्ट्या मागास राहिलेल्या, कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने ही योजना हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील या ८ शाळांची निवड जिल्हा परिषद शाळा, केळशी नंबर १, जि.प. कोंडमळा, जि.प. खालगाव धामणेवाडी नं. ३, जि.प. शाळा, सापुचतळे, जि.प. साखरी आगार नं.१, जि.प. कुवारबाव, महालक्ष्मीनगर, जि.प. भारणे नाका नं. १, जि. प. आदर्श शाळा लोटेमाळ या आठ शाळांची निवड करण्यात आली आहे.

काय आहे योजना

या प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या, नगरपलिका पीएम श्री, विद्यानिकेतन शाळांतून निवड होते. शालेय शिक्षण, क्रीडा विभागाच्या समन्वयाने शिक्षण आयुक्तांची देखरेख यावर राहणार, राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्था, विशेष घटक योजना, शिक्षण संचालक प्राथमिक यांच्यामार्फत जिल्हानिहाय निधी वाटप होणार. विकसित महाराष्ट्र-२०४७ शी सुसंगत शाळा बनवणे हा उद्देश शासनाचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news