Ponda Murder Case | फोंडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई! खाजोर्डा खून प्रकरणातील मुख्य आरोपीला 24 तासांत बेड्या

Ponda Murder Case | तोर्ल-शिरोडा भागातून ताब्यात; दहा दिवसांची पोलिस कोठडी
Kashimira firing case
काशीमिरा गोळीबार प्रकरणातील पप्पू पेजरला 3 वर्षांनंतर बेड्याpudhari photo
Published on
Updated on

फोंडा : पुढारी वृत्तसेवा

खाजोर्डा-बोरी येथे रविवारी (दि.३) घडलेल्या खूनप्रकरणातील फरारी मुख्य संशयित आरोपीला फोंडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. या जलद कारवाईबद्दल फोंडा पोलिसांचे कौतुक होत आहे.

Kashimira firing case
Shirdi Fraud Case | नाशिकच्या भोंदूबाबाचे 'ईडी' कनेक्शन! प्रतिभा चाकणकरांची चौकशी; 2 कोटींच्या संशयास्पद व्यवहारांचा पेच

दुर्गम तोर्ल-शिरोडा भागात मावशीच्या घरी लपून बसलेल्या गौरेश कुशन नाईक याला पोलिसांनी शोधून काढत अटक केली. रविवारी खाजोर्डा येथे दीपक राया नाईक याचा क्षुल्लक कारणावरून खून करण्यात आला होता. वाटेवरील कौले काढण्याच्या कारणावरून गौरेश कुशन नाईक व साईदीप कुशन नाईक या दोघा भावांनी दीपक नाईक याच्याशी वाद घालून त्याला मारहाण केली.

यावेळी गौरेश नाईक याने घरातील कुन्हाड आणून दीपकच्या मानेवर वार केला. यात दीपक नाईक याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर गौरेश नाईक दुचाकीवरून पळून गेला होता. दरम्यान, साईदीप नाईक पोलिसांच्या ताब्यात सापडला असून त्याला फोंडा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Kashimira firing case
Child Mortality Control | बालमृत्यू रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्य आणि जिल्हा स्तरावर 'लसीकरण कृती दल' स्थापन

फरारी गौरेशचा शोध घेताना पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. तोर्ल भागातील त्याच्या मावशीच्या घरी पोलिस पोहोचले असता, घरात झाकून ठेवलेली दुचाकी आढळली. यावरून संशय बळावल्याने तपास केला असता गौरेश घरात लपून बसलेला असल्याचे उघड झाले.

त्यानंतर पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मोहन गावडे व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास फोंडा पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news