Diva-Chiplun MEMU Train 2026 | उन्हाळी सुट्टीसाठी १ मेपासून दिवा-चिपळूण मेमू ट्रेन सुरू

उन्हाळी सुट्टीसाठी १ मेपासून दिवा-चिपळूण मेमू ट्रेन सुरू
Diva-Chiplun MEMU Train 2026
Diva-Chiplun MEMU Train 2026
Published on
Updated on

चिपळूण : कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक आनंदाची बातमी दिली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमधील प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त मेमू ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

१ मे ते ७ जून या कालावधीत ही विशेष सेवा उपलब्ध असेल. प्रामुख्याने शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही अनारक्षित रेल्वे गाडी सुरू होत आहे, ज्यामुळे चाकरमान्यांना फायदा होणार आहे.

Diva-Chiplun MEMU Train 2026
Guhagar Beach Safety Alert | गुहागरमध्ये जीवरक्षक रजेवर; पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

ही विशेष मेमू ट्रेन आठवड्यातून तीन दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण ते दिवा (गाडी क्रमांक ०११६०) ही रेल्वे दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि रात्री ११.१० वाजता दिवा जंक्शनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दिवा ते चिपळूण (गाडी क्रमांक ०११५९) ही रेल्वे रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता चिपळूणला पोहोचेल. महिनाभराच्या कालावधीत दोन्ही बाजूंकडून एकूण ३६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

आठ डब्यांची ही मेमू लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहे. यामध्ये २३ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. दिवा-चिपळूण विशेष मेमू ट्रेन अंजनी, खेड, कळंबणी बुद्रूक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आप्टा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निळजे या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे.

Diva-Chiplun MEMU Train 2026
Mumbai Mango in Devrukh | देवरुखात दाखल झाला मुंबईचा आंबा !

तसेच कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांना असणारी प्रचंड प्रतीक्षा यादी पाहता, ही अनारक्षित मेमू सेवा प्रवाशांसाठी एक उत्तम पर्याय ठरेल. मात्र डब्यांची संख्या केवळ आठ असल्याने प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार ही सोय पुरेशी ठरेल का, असा प्रश्नही काही प्रवाशांकडून विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news