Dead dolphin Ganpatipule| गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृत डॉल्फिन मासा

देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी लावली योग्य ती विल्हेवाट
Dead dolphin Ganpatipule
मृत डॉल्फिनpudhari photo
Published on
Updated on

Dead dolphin Ganpatipule

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आणि निसर्गरम्य आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आज बुधवारी 4 जून रोजी एक दुर्मिळ डॉल्फिन (देवमासा) दुपारच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आला.

दुपारच्या सुमारास येथील समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्या पर्यटकांना वाळू मध्ये सुमारे चार फूट लांबीचा डॉल्फिन मासा मृतावस्थेत पडलेला दिसला. येथील मृत डॉल्फिन मासा पाहून स्थानिक व्यावसायिक , ग्रामस्थ व अनेक पर्यटकांनी डॉल्फिनच्या दिशेने धाव घेतली. यावेळी डॉल्फिनच्या शरीरावर कोणत्याही मोठ्या जखमेचे स्पष्ट निशाण दिसत नसल्याने त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा असा प्रश्न सर्वांनाच पडला. मात्र डॉल्फिन कोणत्या प्रजातीचा आहे आणि मृत्यू मागील कारण काय असावे याची माहिती मिळालेली नाही.

Dead dolphin Ganpatipule
Rahul Gandhi : 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे लष्कराची बदनामी करणे नव्‍हे'

हा मृत डॉल्फिन मासा सुमारे चार फूट लांबीचा आणि किमान दहा ते बारा किलो वजनाचा असावा असा अंदाज स्थानिक व्यावसायिक व पर्यटकांकडून व्यक्त करण्यात आला. या मृत डॉल्फिन माशाला गणपतीपुळे देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी समुद्र किनाऱ्यावरून बाजूला आणून समुद्रकिनाऱ्यावरील जागेत अतिशय योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची कामगिरी केली.

सागरी जीवांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ

गेल्या काही वर्षांमध्ये समुद्रातील प्रदूषण, जलवाहतुकीतून होणाऱ्या धडक, वादळे आणि हवामान बदल यांमुळे सागरी जीवांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

मृत डॉल्फिनच्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर सागरी पर्यावरणाच्या संवर्धनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. तसेच गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याबरोबरच नजीकच्या मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर गेल्या चार महिन्यांपूर्वी मोठा डॉल्फिन मासा मृतावस्थेत आढळला होता. त्यानंतर आता पावसाळी दिवसात लहान आकाराचा हा डॉल्फिन मासा गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news