Ratnagiri News : गरिबांचे व्यवसाय उद्ध्वस्त करून काय मिळाले?

दापोलीत टपऱ्या-खोक्यांवर फिरवला जेसीबी; मुख्याधिकाऱ्यांवर कुणाचा ‌‘प्रेशर‌’? नागरिकांत जोरदार चर्चा
Dapoli Hawkers Action
Dapoli Hawkers Actionpudhari photo
Published on: 
Updated on: 

दापोली : दापोली नगरपंचायत हद्दीत खोके, टपऱ्या उभारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांच्या व्यवसायांवर ६ ऑक्टोबर रोजी नगरपंचायतीने जेसीबी फिरवला. नर्सरी रोड, हर्णे रोड आणि दाभोळ रोड परिसरातील अनेक खोके जमीनदोस्त केले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे व्यावसायिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, ‌‘ गरिबांचे व्यवसाय उद्ध्वस्त करून काय मिळाले?‌’ असा सवाल उपस्थित होत आहे.

वर्षानुवर्षे या छोट्या व्यवसायांवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या व्यावसायिकांना व्यवसाय हलवण्यासाठी पुरेशी मुदत देण्यात आली नसल्याची तक्रार आहे. एक दिवस आधी सूचना देऊन दुसऱ्याच दिवशी जेसीबी आणणे योग्य आहे का? असा संतप्त सवाल व्यावसायिकांनी केला.

Dapoli Hawkers Action
Raigad News : रेवदंडा-साळाव खाडीवरील पुलाच्या कामाला वेग

‘खोके हटवायचे असतील तर हटवा; मात्र, आम्हाला पर्यायी व्यवस्था द्या. नगरपंचायतीने भाडेतत्त्वावर गाळे किंवा दुकाने उपलब्ध करून द्यावीत. अशी भूमिका व्यावसायिकांनी मांडली. शासनाच्या विविध योजनांतून लघु व्यावसायिकांना कर्ज घेऊन व्यवसाय उभारण्यास प्रोत्साहन दिले जाते. अनेकांनी बँकांकडून कर्ज घेत व्यवसाय उभा केला आहे. आता व्यवसायच जमीनदोस्त झाल्याने कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न संबंधित व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे.

दरम्यान, कारवाईच्या पद्धतीवरून दुजाभाव होत असल्याचा आरोपही करण्यात आला. काही खोके लोकप्रतिनिधी अथवा मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींशी संबंधित असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा सवाल नागरिक व पत्रकारांनी मुख्याधिकारी महेश धुमाळ यांच्याकडे उपस्थित केला. त्यामुळे शहरातील सर्वच अनधिकृत बांधकामांवर समान निकषाने कारवाई होत आहे का? हा प्रश्न आता चर्चेत आला आहे.

Dapoli Hawkers Action
Raigad October Heat : ऑक्टोबर हीटचा तडाखा,हवामान बदलाचे संकट

व्यवसाय हटवणे आवश्यक असल्यास आधी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यानंतर कारवाई करावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून जोर धरू लागली आहे. या कारवाईमागे प्रशासनाचा निर्णय आहे की कुणाचा दबाव, याबाबतही शहरात चर्चा रंगली आहे.

तहसील कार्यालयाशेजारील खोकेही हटविणार....

तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या दोन-तीन खोक्यांबाबत सध्या ‌‘जैसे थे‌’ ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, या खोक्यांबाबत नगरपंचायत न्यायालयात जाऊन त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचे दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश धुमाळ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news