Chiplun Fire: चिपळूणमध्ये आगीची दुर्घटना थोडक्यात टळली

दहा खासगी ट्रॅव्हल्स बसेस दुर्घटनेतून बचावल्या
Chiplun Fire
चिपळूणमध्ये आगीची दुर्घटना थोडक्यात टळली
Published on
Updated on

चिपळूण : चिपळूण शहरात शुक्रवारी रात्री मोठी आगीची दुर्घटना घडण्याची शक्यता असताना वेळेवर करण्यात आलेल्या तत्पर कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला. दहा खासगी ट्रॅव्हल्स बसेस या आगीपासून बचावल्या.

Chiplun Fire
Solapur Fire incident: बारदाण्याच्या दुकानाला आग

शुक्रवारी रात्री सुमारे बाराच्या सुमारास चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकासमोरील अरिहंत कॉम्प्लेक्सच्या शेजारी असलेल्या गवत व कचऱ्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले. अरिहंत कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास असलेले ॲड. चिन्मय दीक्षित यांनी प्रसंगावधान राखत तातडीने ही बाब खासगी बसचालक मंदार लाड यांना कळवली. यानंतर मंदार लाड त्वरित घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी तत्काळ नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी पाठवला आणि स्वतःही आगीच्या ठिकाणी दाखल झाले. आग भडकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून रात्री एक वाजेपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

दरम्यान, या ठिकाणी दहा ट्रॅव्हल्स बसेस उभ्या होत्या. चिपळूण नगरपालिकेचे पार्किंग याच परिसरात असले तरी तेथे सुरू असलेल्या कामामुळे ठेकेदाराने कुलूप लावले असल्याने या बसेस रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आल्या होत्या. मंदार लाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आपापल्या गाड्या तातडीने बाजूला काढल्या. मात्र काही बसेसना आगीची झळ बसली असून काही गाड्यांचे लाईट्स वितळले, तर काहींच्या काचा फुटल्या. नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मंदार लाड व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले.

Chiplun Fire
Goa Night Club Fire Case | हडफडे सरपंच, माजी सचिवाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news