Ratnagiri Fisheries Census | मत्स्य संपदेची केंद्राकडून होणार मोजदाद

Ratnagiri Fisheries Census | चार वर्षांचा आढावा घेऊन माहिती संकलन; मत्स्योत्पादनासह मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीचेही चित्र स्पष्ट होणार
Fishing News
मत्स्योत्पादनासह मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीचेही चित्र स्पष्ट होणार
Published on
Updated on

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा
देशातील मत्स्यव्यवसायाची नेमकी सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाने सागरी मत्स्यव्यवसाय गणना २०२५ हाती घेतली आहे. गेल्या काही वर्षांतील मत्स्य उत्पादन, मच्छीमार कुटुंबांची संख्या, उत्पन्न, विमा, कर्ज, सरकारी योजनांचा लाभ आणि मत्स्यव्यवसायातील बदल यांची माहिती डिजिटल पद्धतीने संकलित करण्यात आली आहे.

Fishing News
Ratnagiri News : रत्नागिरी शहरातील सात झोपडपट्ट्यांचे होणार पुनर्वसन

देशातील १३ किनारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे ५ हजार गावांमधील १२ लाख मच्छीमार कुटुंबांचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील महत्त्वाचे मत्स्य केंद्र असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याची आकडेवारीही विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर हजारो कुटुंबांचे आर्थिक गणित अवलंबून आहे.

२०२४-२५ मध्ये जिल्ह्याचे सागरी मत्स्यउत्पादन ७१ हजार ३०३ मे. टन झाले. २०२३-२४ मध्ये हे उत्पादन ६७ हजार ९७७ मे. टन होते, म्हणजे एका वर्षात ३ हजार ३२६ मे. टनांची वाढ झाली. मात्र, उत्पादन वाढले असले तरी मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीचे चित्र तितके सरळ नाही.

यापूर्वीच्या आकडेवारीत जिल्ह्यातील मासेमारी नौकांची संख्या आणि मत्स्यउत्पादनात मोठी घट झाल्याचे समोर आले होते. २०२१-२२ मध्ये जिल्ह्यात २ हजार ९३६ मासेमारी नौका होत्या; २०२२-२३ मध्ये ही संख्या २ हजार ५२० वर आली.

याच कालावधीत मासळीचे उत्पादन १ लाख १२ हजार २८ मे. टनांवरून ६२ हजार ७१७ मे. टनांवर घसरल्याचे नोंदविण्यात आले होते, म्हणजे उत्पादनात तब्बल ३८ हजार मे. टनांपेक्षा अधिक घट झाली होती. हवामानातील बदल, समुद्रातील बदलते वातावरण, मासळीची उपलब्धता, वादळी हवामानामुळे वाया जाणारे मासेमारीचे दिवस आणि वाढता इंधन खर्च याचा थेट परिणाम मच्छीमारांच्या उत्पन्नावर होत आहे.

Fishing News
Konkan railway demand : कोकणवासियांसाठी बडोदा-रत्नागिरी रेल्वे कायमस्वरूपी सुरू करा

रत्नागिरीतील मच्छीमार संघटनांनी २०२६ मध्ये चालू मासेमारी हंगामातील कमी उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर 'मत्स्य दुष्काळ' जाहीर करून विशेष आर्थिक मदत देण्याची मागणी शासनाकडे केली होती.
मत्स्यव्यवसायाचे बदलते चित्र...

जिल्ह्यात ५० नोंदणीकृत निमखारे पाणी कोळंबी प्रकल्प असून, त्यातून ३२७ मे. टन उत्पादन झाले, तसेच ४१ पाटबंधारे व जलसंधारण तलावांमधून २०२४-२५ अखेर ६४०.७ मे. टन मत्स्यउत्पादन झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news