Bhoste Ghat Road |भोस्ते घाटात रस्त्याला मोठमोठ्या भेगा

भोस्ते घाटात रस्त्याला मोठमोठ्या भेगा
Bhoste Ghat Road
Bhoste Ghat Road
Published on
Updated on

खेड : पावसामुळे मुंबई-गोवा घाटात महामार्गावरील भोस्ते धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून घाटातील रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या भेगा लपवण्यासाठी ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.

Bhoste Ghat Road
संभाजी महाराज स्मारकाला गती; ३५० कोटींचा नवा आराखडा

त्यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून वाहनचालकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच भोस्ते येथील स्थानिक नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्या रेवती पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

पाहणीदरम्यान ठेकेदाराने सिमेंटचे पाणी टाकून आणि इतर साहित्य वापरून पडलेल्या भेगा बुजवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. टाकण्यात आलेले साहित्य बाजला करून रेवती पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता भेगा अत्यंत खोलवर गेल्याचे स्पष्ट झाले. यावेळी त्यांनी ठेकेदाराला नागरिकांच्या जीवाशी खेळू नये, अशा शब्दांत सुनावत तत्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

Bhoste Ghat Road
Barsu Refinery Controversy | बारसू–सोलगाव अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात राजापूर पंचायत समितीचा एकमुखी ठराव

ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी

तसेच या गंभीर प्रकाराची माहिती तालुका प्रशासनालाही देण्यात आली असून तांत्रिक पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे. भोस्ते घाटातील धोकादायक वळणावर रस्ता रुंदीकरणाचे काम सध्या भर पावसात सरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news