Anuskura Ghat Accident |अणुस्कुरा घाटात टेम्पोचा ब्रेक निकामी होऊन अपघात, सुदैवाने कुणीही जखमी नाही

Anuskura Ghat Accident | अणुस्कुरा घाटात टेम्पोचा ब्रेक निकामी होऊन अपघात, सुदैवाने कुणीही जखमी नाही
Anuskura Ghat Accident
Anuskura Ghat Accident
Published on
Updated on

राजापूर - गेले काही दिवस कोल्हापूरकडे जाणाऱ्या अणूस्कुरा घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता कोल्हापूर कडून आलेल्या वाहनाचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. सदर वाहन घाटात आडवे झाले. असून एकेरी वाहतूक सुरु होती. या अपघातात सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही.

Anuskura Ghat Accident
Ganja Seized Ratnagiri | रत्नागिरीत २ किलो १०० ग्रॅम गांजासह एकाला अटक

एम. एच. ०४ सी. यु. ०५६६ या टेम्पोतून कोल्हापूर, पन्हाळा येथे नमन कार्यक्रमासाठी त्या टेम्पोतून कलाकार मंडळी गेली होती. कार्यक्रम आटोपून ती अणूस्कुरा घाटमार्गे परत येत असताना त्यांच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले आणि त्या वाहनाने मार्गांवरच पलटी मारली. त्या झालेल्या अपघातात सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही.

Anuskura Ghat Accident
Ganeshotsav 2026 | जपानी पर्यटकही भारावला जैतापूरच्या गणेशोत्सवाने; भक्तिमय वातावरण, परंपरा अन् आपुलकीचे केले कौतुक

अपघाताची माहिती कळताच राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रायपाटण पोलीस दूरक्षेत्रसह अणूस्कुरा चौकीवरील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी हजर झाले होते. घाटात होणारे अपघात लक्षात घेऊन आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी काही दिवसांपूर्वी घाटात क्रेन उपलब्ध करून दिली होती. त्या क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन हलविण्यात येऊन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news