गव्हे येथे आईने चिमुकल्यासह संपवले जीवन

दापोली येथील ह्रदय पिळवून टाकणारी घटना
Mother's Sucide With Her Son
दापोली आईने संपवले मुलासह जीवन File Photo

दापोली, पुढारी वृतसेवा : दापोली तालुक्यातील गव्हे येथील सिया सूरज म्हाब्दी यांनी आपल्या दोन वर्षाच्या मुलगा समर म्हाब्दी याला घेवून जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना ही शुक्रवारी दि. २८ रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Mother's Sucide With Her Son
ब्रेकिंग : कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल सूरज निकमने जीवन संपवले

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया हिच्या घरातील सर्व मंडळी नेहमी प्रमाणे कामामध्ये व्यस्त होती. थोड्या वेळानंतर सिया आणि तिचा मुलगा घरी नसल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. त्यानंतर घरच्यानी शोधा-शोध सुरू केली. मात्र, ती दोघे कोठेही सापडत नसल्यामुळे अखेर दापोली पोलीस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

या घटनेची नोंद सुरू असतानाच एका विहीरीच्या काठावर सियाचे चप्पल असल्याचे आढळून आले. या नंतर विहिरीत शोध घेतल्यावर सिया आणि समरचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर पंचनामा होऊन सायंकाळी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. दापोली पोलीस स्थानकात घटनेची नोंद करण्यात आली असून. पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news