ब्रेकिंग : कुमार महाराष्ट्र केसरी मल्ल सूरज निकमने जीवन संपवले

नैराश्यातून संपवली जीवनयात्रा
Maharashtra Kesari Mall Suraj Nikam ended his life
मल्ल सूरज निकमPudhari Photo
Published on
Updated on

विटा पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील युवा कुस्तीगीर आणि कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा विजेता सुरज जनार्दन निकम ( वय.30, रा नागेवाडी, ता. खानापूर) याने राहत्या घरी गळफास लावून जीवन यात्रा संपवली. सदर घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. कुस्ती क्षेत्रात अत्यंत कमी वयात नावलौकीक मिळवणाऱ्या एका युवा कुस्तीपटूच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कुमार महाराष्ट्र केसरी पै. सुरज निकम गेल्या काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त होता. कुस्ती खेळताना त्याला सतत दुखापत होत असल्याने त्याला नैराश्य आले होते. अलीकडच्या काळात त्याचा चिडचिडेपणा वाढला होता. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास तो घरात एका खोलीत दार बंद करून बसला होता. मात्र सायंकाळी पाचवाजेपर्यंत त्याने दरवाजा उघडला नाही. कुटुंबातील सदस्यांनी त्याला बाहेरून हाका मारणे सुरू केले. परंतु प्रतिसाद मिळत नाही. हे पाहून दरवाजा जबरदस्तीने उघडला. तेंव्हा त्याने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

तात्काळ खाली काढून त्याचे भास्कर जोतीराम जाधव यांनी विट्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वी मृत असल्याचे घोषित केले. 2014 मधील कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील तो विजेता होता. 2018 साली त्याने उपमहाराष्ट्र केसरी किताब मिळवला होता. महाराष्ट्र केसरी पै. अभिजित कटके याच्या विरोधात उपांत्य सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला.

Maharashtra Kesari Mall Suraj Nikam ended his life
बायपोलर डिसऑर्डर आजाराने त्रस्त तरूणाने संपवले जीवन

आतंरराष्ट्रीय पातळीवर देशाचा नावलौकीक मोठा करण्याचा त्याचा मनसुबा होता. माती आणि गादी अशा दोन्ही कुस्तीच्या प्रकारात त्याने प्राविण्य मिळवले होते. प्रेश्नणिय कुस्तीने तो कुस्ती शौकीनांच्या स्मरणात राहिल. राष्ट्रीय सुवर्णपदक बिजेता मल्ल, पै. जस्सापट्टी, पै. किरण भगत, पै. समाधान घोडके, पै. बाला रफिक यांच्यासोबत झालेल्या त्याच्या कुस्त्या स्मरणात राहण्यासारख्या झाल्या होत्या. नागेवाडी येथे मोठे कुस्ती मैदान व्हावे, यासाठी तो कार्यरत होता. त्याच्या निधनाने कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

पै. सुरज निकम याची घरची पार्श्वभूमी गलाई व्यवसायाची आहे. त्याच्या वडिलांचे आसाम येथे गलाईचे दुकान होते. गेल्या वर्षीच त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. घरात आई आहे. उद्या शनिवारी (दि.28) दुपारी एक वाजण्याच्या सुमा रास नागेवाडी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news