

रत्नागिरी : जीएसटीचे दर कमी केल्यामुळे दसर्याच्या मुहूर्तावर रत्नागिरीत वाहनखरेदीत उत्साह पाहायला मिळाला. साडेतीनपैकी एक असलेल्या या सुमुहूर्तावर रत्नागिरीकरांनी हजारो वाहनांची खरेदी केली आहे. उपप्रादेशिक परिवहन रत्नागिरी विभागात एकूण 1 हजार 329 वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातून 5 कोटी 1 लाख 78 हजार 382 इतका शासकीय महसूल आरटीओ कार्यालयास प्राप्त झाला आहे.
दसर्याच्या मुहूर्तावर रत्नागिरीकरांनी सोने -चांदीनंतर वाहन खरेदीलाही पसंती दिली. यावेळी रत्नागिरीवासीयांनी मोठ्या उत्साहात वाहनांची खरेदी केली. दसर्यासाठी 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रीक वाहनांची बुकिंग झाले.
दसर्याच्या दिवशी पूजा करून वाहन घरी नेले. दरम्यान, मागील आठवड्याभरापासून वाहनांची नोंदणी वेळेत व्हावी आणि रत्नागिरीकरांना वाहने वेळेत मिळावीत याकरिता रत्नागिरी आरटीओ कार्यालयात अधिकारी, कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. तब्बल 13 हजार 329 वाहनांची नोंदणी झाली असून, त्यातून 5 कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे. त्यापैकी 4 कोटी 76 लाख 42 हजार 382 नोंदणी शुल्क व करातून तर उर्वरित 232 वाहनांच्या आकर्षक क्रमांक शुल्कातून 25 लाख 36 हजार रक्कम शासनास जमा झाली आहे.
‘या’ वाहनांची झाली नोंदणी
दुचाकी, स्कूटर- 887
अॅडॅप्टेड व्हेईकल-2
चारचाकी- 289
रिक्षा- 81
गुड्स- 61
मोटारकॅप-3
रुग्णवाहिका-1
डंपर-3
एकूण- 1329
दसर्याच्या मुहूर्तावर दुचाकी,चारचाकी, तीनचाकीसह इतर असे एकूण 1329 वाहनांच्या नोंदी झाल्या आहेत. रत्नागिरीकरांचा वाहनखरेदीसाठी उत्साह मोठा दिसून आला. वाहन नोंदणी वेळेत व्हावी आणि वाहनधारकांना गाडी लवकर मिळावी, यासाठी विशेष नियोजन केले होते. वाहन नोंदणीतून 5 कोटी 1 लाख 78 हजार 382 इतका शासकीय महसूल प्राप्त झाला. त्यापैकी 4 कोटींहून अधिक नोंदणी शुल्क तर उर्वरित आकर्षक वाहनक्रमांच्या नोंदणीमधून उत्पन्न मिळाले आहे.
राजवर्धन करपे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी