रत्नागिरी : रिक्षा चालकाचे महिलेशी गैरवर्तन

रत्नागिरी : रिक्षा चालकाचे महिलेशी गैरवर्तन

 रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : आणखी एका रिक्षाचालकाने महिलेची छेड काढून अश्लील वर्तन केल्याचा प्रकार रविवारी रात्री माळनाका परिसरात घडला आहे. महिलेने रुद्रावतार दाखवत नातेवाईकांना बोलावून घेताच नातेवाईकासह जमावाने त्या रिक्षाचालकाला जबर मारहाण केली. या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकाने एका प्रवासी तरूणीशी अश्लिल वर्तन केल्यानंतर त्या तरूणीने धाडस दाखवत झालेला प्रकार सोशल मीडियावर पोस्ट केला. यामुळे संवेदनशील असलेल्या पोलीस खात्याने तात्काळ त्याची दखल घेऊन सीसी टीव्ही फुटेज आणि मुलीने दिलेल्या माहितीवरून रिक्षाचालकाला ताब्यात घेतले.

अनेक महिला संघटनांनी त्या रिक्षा व्यवसायिकावर कडक कारवाईची मागणी केली. रिक्षाच चालकाच्या या हिनकृत्याने त्याची समाजात प्रचंड बदनामी झाली. त्याने असे अनेक प्रकार केल्याचे नंतर उघड झाले. या बदनामीमुळे संबंधित रिक्षाचालकाने आत्महत्या केली. या सर्व प्रकाराने रिक्षा चालकांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला होता. परंतु, रिक्षा संघटनांनीही या घटनेचा निषेध केला. हा प्रकार विस्मरणात जात असताना काल आणखी एका रिक्षाचालकाने प्रवासी महिलेशी अश्लिल प्रकार केल्याचे उघड झाले. महिला प्रवासी मारूती मंदिरच्या दिशेने जात असताना संबंधित रिक्षा चालकाने तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, अशी विचारणा केली. यावरून महिला आणि रिक्षाचालकामध्ये जोरादार वाद झाला. महिलेने तात्काळ आपल्या नातेवाईकांना फोन करून बोलावून घेतले.

हा प्रकार सांगितल्यानतर संबंधित नातेवाईकाने माळनाका येथे त्या रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. काही क्षणात त्या ठिकाणी मोठा जमाव जमला. महिलेशी अश्लिल वर्तन केल्याचे सांगितल्यानतंर जमावानेही त्याची इथेच्छ धुलाई केली. जमाव झाल्यामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली. पोलिसांपर्यंत हा विषय गेल्यानंतर तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल होऊन रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. शहर पोलीस ठाण्यात त्या रिक्षा चालकाविरुद्द अदखलपात्र गुन्हा दखल केला आहे.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news