सिंधुदुर्ग: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाचे धरणे आंदोलन

सिंधुदुर्ग: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाचे धरणे आंदोलन

ओरोस; पुढारी वृत्तसेवा: कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यात परप्रांतीय बांगलादेशी लाभार्थींचा समावेश पीएम किसान योजनेत करण्यात आला आहे. त्यांना या योजनेतर्गंत ७ हप्तेही मिळाले आहेत. तरी या प्रकारणाची गंभीर दखल घेऊन जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने आज (दि. २७) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार वैभव नाईक, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडी प्रमुख जानवी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडले.

यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, बबन बोभाटे, रुपेश पावसकर, छोटू पारकर, मंदार शिरसाट, दीपक आंगणे, संतोष शिरसाट, अवधूत मालणकर, मिलिंद परब, शेखर गावडे, नागेश ओरोस्कर, वसंत बांबुळकर,,डिगस सरपंच पूनम पवार, स्नेहा गवंडे आदी उपस्थित होते.

डिगस, कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यात परप्रांतीयांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या काळात तीन लाखांहून अधिक परप्रांतीय सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परत पाठविले होते. परंतु, ही संख्या पुन्हा दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढू लागली आहे. पीएम किसान योजनेत आणि मतदार यादीमध्येही परप्रांतीय मतदार असण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news