Ganpati Special Trains 2025: कोकण रेल्वेच्या 11 विशेष गाड्या; वेळापत्रक, थांबे, बुकिंग कधीपासून संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Ganpati Vishesh Konkan Railway Timetable: या गाड्यांसाठीचं बुकिंग 25 जुलैपासून सुरू होणार आहे. या एक्स्प्रेस गाड्यांचा क्रमांक, थांबे कुठे, वेळापत्रक काय हे वाचा
Konkan Railway Ganpati Special Trains
Konkan Railway Ganpati Special TrainsPudhari
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे

गणपती स्पेशल गाड्यांच्या एकूण 125 फेऱ्या

25 जुलैपासून ऑनलाईन आरक्षणाला सुरूवात

22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत स्पेशल गाड्या

Konkan Railway Ganpati Special Trains 2025 Full List Timings

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या मुंबई, ठाणे, कल्याण, भांडुप, पुणे या भागात राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने 11 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व गाड्या 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.  या गाड्यांसाठीचं बुकिंग 25 जुलैपासून सुरू होणार आहे. या एक्स्प्रेस गाड्यांचा क्रमांक, थांबे कुठे, वेळापत्रक काय हे जाणून घेऊया...

१) गाडी क्र. ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी विशेष

  • वार: दररोज

  • वेळ (गाडी क्र. ०११५१): मुंबई सीएसएमटी येथून दररोज ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

  • वेळ (गाडी क्र. ०११५२): सावंतवाडी रोड येथून दररोज १५:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:३५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

  • थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

  • रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी - ०२, स्लीपर - १२, जनरल - ०६, एसएलआर - ०२.

Konkan Railway Ganpati Special Trains
Ganpati Special ST Bus Maharashtra: चाकरमान्यांसाठी खुशखबर, गणेशोत्सवात कोकणासाठी ५ हजार जादा बसेस धावणार; असं करा बुकिंग

२) गाडी क्र. ०११७१ / ०११७२ लोकमान्य टिळक (टी) - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक (टी) विशेष

  • वार: दररोज (२२/०८/२०२५ ते ०८/०९/२०२५)

  • वेळ (गाडी क्र. ०११७१): लोकमान्य टिळक (टी) येथून दररोज ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २१:०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

  • वेळ (गाडी क्र. ०११७२): सावंतवाडी रोड येथून दररोज २२:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०:४० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

  • थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

  • रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी - ०२, स्लीपर - १२, जनरल - ०६, एसएलआर - ०२.

३) गाडी क्र. ०११५३ / ०११५४ मुंबई सीएसएमटी - रत्नागिरी - मुंबई सीएसएमटी विशेष

  • वार (गाडी क्र. ०११५३): दररोज (२२/०८/२०२५ ते ०८/०९/२०२५)

  • वार (गाडी क्र. ०११५४): दररोज (२३/०८/२०२५ ते ०९/०९/२०२५)

  • वेळ (गाडी क्र. ०११५३): मुंबई सीएसएमटी येथून दररोज ११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

  • वेळ (गाडी क्र. ०११५४): रत्नागिरी येथून दररोज ०४:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १३:३० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

  • थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

  • रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी - ०२, स्लीपर - १२, जनरल - ०६, एसएलआर - ०२.

४) गाडी क्र. ०११०३ / ०११०४ मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी रोड - मुंबई सीएसएमटी विशेष

  • वार (गाडी क्र. ०११०३): दररोज (२२/०८/२०२५ ते ०८/०९/२०२५)

  • वार (गाडी क्र. ०११०४): दररोज (२३/०८/२०२५ ते ०९/०९/२०२५)

  • वेळ (गाडी क्र. ०११०३): मुंबई सीएसएमटी येथून दररोज १५:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

  • वेळ (गाडी क्र. ०११०४): सावंतवाडी रोड येथून दररोज ०४:३५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १६:४० वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.

  • थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामठे, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

  • रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी - ०२, स्लीपर - १२, जनरल - ०६, एसएलआर - ०२.

Konkan Railway Ganpati Special Trains
Mumbai Konkan Sea Route: चाकरमान्यांना बाप्पा पावला, मुंबई- मालवण साडेचार तासांत; गणपतीत कोकणात जा बोटीने

५) गाडी क्र. ०११६७ / ०११६८ लोकमान्य टिळक (टी) - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक (टी) विशेष

  • वार (गाडी क्र. ०११६७): दररोज (२२/०८/२०२५ ते ०८/०९/२०२५)

  • वार (गाडी क्र. ०११६८): दररोज (२३/०८/२०२५ ते ०९/०९/२०२५)

  • वेळ (गाडी क्र. ०११६७): लोकमान्य टिळक (टी) येथून दररोज २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०९:२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

  • वेळ (गाडी क्र. ०११६८): सावंतवाडी रोड येथून दररोज ११:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ००:४० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

  • थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

  • रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी - ०२, स्लीपर - १२, जनरल - ०६, एसएलआर - ०२.

६) गाडी क्र. ०११५५ / ०११५६ दिवा जं. - चिपळूण - दिवा जं. मेमू विशेष

  • वार: दररोज (२३/०८/२०२५ ते १०/०९/२०२५)

  • वेळ (गाडी क्र. ०११५५): दिवा जं. येथून दररोज ०७:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.

  • वेळ (गाडी क्र. ०११५६): चिपळूण येथून दररोज १५:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२:५० वाजता दिवा जं. येथे पोहोचेल.

  • थांबे: निलजे, तळोजा पंचनंद, काळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिथे, हमारापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवणखवटी, काळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी.

  • रचना: एकूण ०८ मेमू डबे.

७) गाडी क्र. ०११६५ / ०११६६ लोकमान्य टिळक (टी) - मडगाव जं. - लोकमान्य टिळक (टी) विशेष

  • वार: साप्ताहिक (मंगळवारी- 26 ऑगस्ट, 2 सप्टेंबर, 9 सप्टेंबर)

  • वेळ (गाडी क्र. ०११६५): लोकमान्य टिळक (टी) येथून ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:३० वाजता मडगाव जं. येथे पोहोचेल.

  • वेळ (गाडी क्र. ०११६६): मडगाव जं. येथून १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:५० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

  • थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, माडुरे, थिवीम आणि कार्मली.

  • रचना: एकूण २१ LHB डबे = फर्स्ट एसी - ०१, २ टियर एसी - ०३, ३ टियर एसी - १५, जनरेटर कार - ०२.

८) गाडी क्र. ०११८५ / ०११८६ लोकमान्य टिळक (टी) - मडगाव जं. - लोकमान्य टिळक (टी) विशेष

  • वार: साप्ताहिक (बुधवार - २७/०८/२०२५ व ०३/०९/२०२५)

  • वेळ (गाडी क्र. ०११८५): लोकमान्य टिळक (टी) येथून ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:३० वाजता मडगाव जं. येथे पोहोचेल.

  • वेळ (गाडी क्र. ०११८६): मडगाव जं. येथून १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:५० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

  • थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, माडुरे, थिवीम आणि कार्मली.

  • रचना: एकूण २१ LHB डबे = फर्स्ट एसी - ०१, २ टियर एसी - ०१, ३ टियर एसी - ०५, स्लीपर - ०८, जनरल - ०४, एसएलआर - ०१, जनरेटर कार - ०१.

९) गाडी क्र. ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी) - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक (टी) विशेष

  • वार: साप्ताहिक (मंगळवार - २६/०८, ०२/०९, ०९/०९/२०२५)

  • वेळ (गाडी क्र. ०११२९): लोकमान्य टिळक (टी) येथून ०८:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२:२० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

  • वेळ (गाडी क्र. ०११३०): सावंतवाडी रोड येथून २३:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११:४५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

  • थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

  • रचना: एकूण २२ डबे = ३ टियर एसी - ०२, स्लीपर - १२, जनरल - ०६, एसएलआर - ०२.

१०) गाडी क्र. ०१४४५ / ०१४४६ पुणे जं. - रत्नागिरी - पुणे जं. विशेष

  • वार: साप्ताहिक (मंगळवार - २६/०८, ०२/०९, ०९/०९/२०२५)

  • वेळ (गाडी क्र. ०१४४५): पुणे जं. येथून ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

  • वेळ (गाडी क्र. ०१४४६): रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पुणे जं. येथे पोहोचेल.

  • थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

  • रचना: एकूण २० LHB डबे = २ टियर एसी - ०३, ३ टियर एसी - १५, एसएलआर - ०१, जनरेटर कार - ०१.

Konkan Railway Ganpati Special Trains
Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 39 डेंजरस्पॉट

११) गाडी क्र. ०१४४७ / ०१४४८ पुणे जं. - रत्नागिरी - पुणे जं. विशेष

  • वार: साप्ताहिक (शनिवार - २३/०८, ३०/०८, ०६/०९/२०२५)

  • वेळ (गाडी क्र. ०१४४७): पुणे जं. येथून ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.

  • वेळ (गाडी क्र. ०१४४८): रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५:०० वाजता पुणे जं. येथे पोहोचेल.

  • थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

  • रचना: एकूण २२ LHB डबे = २ टियर एसी - ०१, ३ टियर एसी - ०४, स्लीपर - ११, जनरल - ०४, एसएलआर - ०२.

Q

गणपती विशेष गाड्यांचं बुकिंग कधीपासून सुरू होणार आहे?

A

सर्व गाड्यांचे बुकिंग हे 25 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे.

Q

गणपती विशेष गाड्यांचं ऑनलाइन तिकीट कुठे बुक करता येईल?

A

रेल्वेच्या www.irtctc.co.in या वेबसाईटवरून किंवा Amazon, Bookmytrip सारख्या वेबसाईटवरून बुकिंग करता येईल.

प्रवाशांनी अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा www.konkanrailway.com या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news