बिपरजॉय’ गेले पाकिस्तानकडे; कोकण किनारपट्टीचा धोका टळला

बिपरजॉय’ गेले पाकिस्तानकडे; कोकण किनारपट्टीचा धोका टळला
Published on
Updated on

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा :  अरबी समुद्रात खोलवर बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीला धोक्याचा इशारा दिला होता. परंतु दिशा बदलल्याने कोकण किनारपट्टीचा धोका टळला. मात्र उधाणाच्या मोठ्या भरतीमुळे मिया, काळबादेवी, गणपतीपुळे आदी भागात मोठमोठ्या लाटा उसळल्या होत्या. किनारी भागात वाऱ्याचा वेगही वाढला होता. मात्र या उधाणाच्या भरतीचा तेवढा प्रभाव जाणवला नाही.

किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मच्छीमारांनाही समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने खबरदारी म्हणून याबात अलर्ट राहण्याचे आदेश सर्व विभागाला दिले होते. मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर अजस्र लाटा आदळत होत्या. काळबादेवी किनाऱ्यावरही पाणी भरले होते. गणपतीपुळे किनाऱ्यावर या भरतीचा प्रभाव जाणवला. त्यामुळे पर्यटकांसह नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टी भागात वादळीवारे आणि वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय समुद्रात १०५ ते १५० तर किनारपट्टीला ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. लाटांच्या उंचीतदेखील वाढ होणार असल्याने प्रशासनाकडून मच्छीमार, पर्यटक आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुरूवारी दुपारी अचानक समुद्राच्या पाणीपातळीत वाढ झाली.

गुरूवारपासून १० जून या कालावधीत हे चक्रीवादळ अधिक तीव्र होणार आहे. या कालावधीत अरबी समुद्रात ताशी १०५ ते १५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत, तर किनारपट्टीला ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. याशिवाय पाऊसदेखील पडण्याची शक्यता आहे. समुद्राचे पाणी वाढायला सुरुवात झाली आहे. या कालावधीत मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीकरिता जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तुरळक भागामध्ये ९ ते १० जूनला विजेचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ३०-४० किमी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मान्सून १० जूनला कोकणात उतरणार….

वादळाने मोसमी पाऊस आता वेगाने पुढे सरकत आहे, त्यामुळे हवामानात सातत्याने बदल होत आहेत. १० जूनला मान्सून कोकण किनारपट्टी भागात दाखल होण्याची शक्यता आहे. काही भागात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news