सावंतवाडी : ZP च्या माजी सदस्य आनंदी परब सहकुटुंब शिवबंधनात

सावंतवाडी : ZP च्या माजी सदस्य आनंदी परब सहकुटुंब शिवबंधनात

सावंतवाडी: पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक रंगात आली असतानाच भाजपाच्या तळवडे येथील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आनंदी परब यांच्यासह त्यांचे पती रवींद्रनाथ परब, मुलगा विद्याधर परब आदीनी शिवसेना आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. आ.केसरकर यांनी विद्याधर परब यांना सहकाराची तालुक्यातून रिक्त असलेली जिल्हा बँक संचालक पदाची उमेदवारी जाहीर केली.

तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सखाराम उर्फ बाबल ठाकूर, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष डि. बी. वारंग, अनारोजीन लोबो, निता राणे, राजन पोकळे , एकनाथ नारोजी, अशोक दळवी, नारायण राणे यांच्याहस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश समारंभ झाला.

भाजपातून शिवसेनेत प्रवेश करणारे तळवडे मधील जिल्हा परिषद माजी सदस्य आनंदी परब, रवींद्रनाथ परब, विद्याधर परब, जालिंदर परब, महेश परब, अभिजीत परब, जयराम परब, विक्रम परब, मनिष परब आदींनी आज शिवसेनेत प्रवेश केला. सावंतवाडी जिल्हा बँकेच्या सावंतवाडी तालुका सहकार मतदार संघातून उमेदवारीसाठी शिवसेनेकडून सखाराम उर्फ बाबल ठाकूर तसेच अपक्ष उमेदवार डि. बी. वारंग इच्छुक होते. आता भाजपाच्या विद्याधर परब यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना आ. केसरकर यांनी उमेदवारी जाहीर केली. तर बाबल ठाकूर यांच्या वर प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष डी. बी. वारंग यांनी देखील शिवबंधन बांधले.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news