रत्नागिरी लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही: रामदास कदम | पुढारी

रत्नागिरी लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही: रामदास कदम

खेड; पुढारी वृत्तसेवा : रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेची आहे, ती कोणत्याही परिस्थितीत सोडली जाणार नाही, असे शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी आज (दि.१) स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे रायगड लोकसभा मतदार संघाचा भाग असलेल्या लोटे येथे त्यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासोबत जाहीर सभा घेतली. त्यावेळी पत्रकारांसोबत ते बोलत होते.

कोकणातील राजकारण आता लोकसभा निवडणुकीपूर्वी तापू लागले आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोटे येथे राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे यांच्यासोबत सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केले. यावेळी सभेपूर्वी मध्यमांसोबत बोलताना कदम म्हणाले की, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. पण भाजप रायगडची आणि  रत्नागिरीची जागा मागत असेल, तर ते योग्य नाही. हे म्हणजे असे आहे, आपण दोघे भाऊ भाऊ, तुझे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लाऊ. रायगडमध्ये सुनिल तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. तर रत्नागिरी येथे विद्यमान खासदार शिवसेनेचा आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना रत्नागिरीचा मतदार संघ सोडणार नाही, असे स्पष्ट मत कदम यांनी व्यक्त केले.

हेही वाचा 

Back to top button