देवगड: पुढारी वृत्तसेवा : भर समुद्रात झालेल्या भांडणाचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात उमटले. बेधुंद खलाशाने आपल्या सहकारी तांडेल व दोन खलाशांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर नौका जळाल्याने सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले. ही घटना आज (दि.११) पहाटे ४.३० च्या सुमारास देवगड समुद्रात घडली. Sindhudurg News
या घटनेत बोटीवरील तांडेल रणजीत बबन डोरलेकर (रा.गावडे आंबेरी, जि. रत्नागिरी) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना गोवा बांबुळी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित दोन खलाशांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर डीवायएसपी सावंत यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. Sindhudurg News
त्याचबरोबर फॉरेंन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. देवगड बंदरातील पंकज प्रभाकर पेडणेकर (रा. साक्षी) यांची मुक्ताई ही यांत्रिकी नौका गुरुवारी मच्छीमारीसाठी देवगड समुद्रात गेली होती. आज पहाटे दोन वाजता नवके वरील खलाशी अनंत तुकाराम तांबे (रा. राजापूर) यांनी तांडेल व इतर खलाशी यांच्याबरोबर भांडण करण्यास सुरुवात केली. भांडण विकोपाला गेल्याने नोकरीवरील सहाय्यक तांडेल रणजीत डोरलेकर यांनी याबाबतची माहिती फोनवरून तत्काळ मालक पेडणेकर यांना दिली.
यावेळी पेडणेकर यांनी तुम्ही आहात त्या ठिकाणाहून तात्काळ बंदरात या असे सांगितल्यावर तांडेल डोरलेकर यांनी नौका थेट देवगड बंदरात आणल्यावर पहाटे 4:30 च्या सुमारास नवक नांगरावर उभी असताना खलाशी अनंत तांबे यांनी पुन्हा आपल्या सहकाऱ्यांसमवेत भांडण्यास सुरुवात केली. खलाशी तांबे यांनी सुरुवातीला शिवीगाळ करून आपले स्वतःचे डोके केबिनच्या काचेवर आपटून स्वतःला जखमी केले. त्यानंतर बर्फ फोडण्याचा लोखंडी भाला घेऊन त्याने प्रथम तांडेल रणजीत बबन डोरलेकर यांच्या डोक्यावर प्रहार केला. यामध्ये सहाय्यक तांडेल रणजीत बबन डोरलेकर गंभीर जखमी झाला.
अशा परिस्थितीत घाबरून जीव वाचवण्यासाठी इतर दोघांनी पाण्यात उडी घेतली व पोहत समुद्रकिनारा गाठला. तर दोन खलाशी तावडीत सापडले. यातील शशिकांत तुकाराम पतयाने व राजेश रघुनाथ आंबेरकर (दोघेही रा. गावडेआंबरी) यांच्याही डोक्यावर त्याने प्रहार केला. यावेळी एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून दुसऱ्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.
या घटनेची माहिती फोनवरून पेडणेकर यांना देतात ते सकाळी पाच वाजता दाखल झाले यावेळी बेधुंद झालेल्या खालशी तांबे यांनी आपल्या सहकाऱ्यांना मारहाण केल्यानंतर बोटच पेटवून दिली. यामुळे बंदरात बोटीवर अग्नी तांडव झाले तसेच इतर मच्छीमारांच्या मदतीने नावके वरील आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, नवक आगीच्या भक्षस्थानी पडली यात नावकेचे केबिन सहीत सुमारे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले.
तीनही गंभीर नौक्यावरील कर्मचाऱ्यांना तत्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथे हलविण्यात आले. यातील तांडेल डोरलेकर यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला गोवा बांबोळी येथे नेण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तर ओरोस येथून फॉरेन्सिक पथक दुपारी दाखल झाले असून ते ते नवके वर तपासणी करीत आहे.
हेही वाचा