Chippy Airport: चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा; ‘डीजीसीए’च्या परवानगीची प्रतीक्षा

Chippy Airport: चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा; ‘डीजीसीए’च्या परवानगीची प्रतीक्षा
Published on
Updated on

कुडाळ: पुढारी वृत्तसेवा : चिपी परूळे (ता.वेंगुर्ले) येथील सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावर नाईट लँडिंगची यंत्रणा बसविण्यात आली आहे. लवकरच या विमानतळावरून नाईट लँडिंग विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी डीजीसीए कडून ग्रीन सिग्नल मिळणे अपेक्षित आहे. ४ डिसेंबररोजी नौसेना दिनानिमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह महनीय व्यक्ती मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. फ्लाय-9 ही विमान कंपनी याठिकाणी विमानसेवा देण्यास सज्ज झाली आहे, अशी माहीती विमानतळ प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. Chippy Airport

सिंधुदुर्ग विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू करणे महत्त्वाचे होते. अखेर प्रशासकीय पातळीवर याबाबत ठोस निर्णय होवून आवश्यक त्या सुविधा पूर्ण करुन घेण्यासाठी विकासक आयआरबी कंपनीला सक्त सुचना देण्यात आल्या होत्या. जिल्हाधिकिरी किशोर तावडे यांनी सुध्दा याबाबत प्रत्यक्ष विमानतळाला भेट देऊन कंपनीला सुचना दिल्या होत्या. Chippy Airport

पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत यांनी सुध्दा याप्रश्नी पाठपुरावा केला होता. अखेर या विमानतळावर नाईट लँडिंगची यंत्रणा बसविण्यात आली आहे. लवकरच दिल्ली येथील डीजीसीएचे पथक या विमानतळावर येऊन सुविधेची तपासणी करून ही सेवा सुरू करण्यास अंतिम मंजुरी देणार आहे.

सध्या या विमानतळावर दिवसाची विमानसेवा सुरू असून अलायन्स एअर ही एकमेव कंपनी विमानसेवा देत आहे. आता फ्लाय-9 कंपनीने सिंधुदुर्ग विमानतळावर विमानसेवा देण्यास अनुकूलता दर्शविली आहे. नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर या विमानतळावर 7 हेलिपॅड तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती विमानतळ सूत्रांनी दिली. दरम्यान दीड वर्षांनंतर चिपी विमानतळावर नाईट लँडिंगसाठीची यंत्रणा कार्यान्वित झाल्याने डीजीसीएच्या परवानगीनंतर या विमानतळावर रात्रीची विमान सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news