कोकण रेल्वे मार्गावरील १२ गाड्या रद्द

file photo
file photo
Published on
Updated on

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : कोकण रेल्वे मार्गावरील 'कोकणकन्या', 'मांडवी'सह १२ गाड्या पावसामुळे सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या कल्याण, पुणे, मिरज, लोंढामार्गे मडगाव जंक्शनवर येणार आहेत. मध्य रेल्वेच्या पनवेल- कळंबोली मार्गावर मालगाडीचे डबे घसरले. याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीवरही झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोकण रेल्वे मार्गावरील १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय ५ गाड्या अंशतः रद्द, तर तीन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या पनवेल ते कळंबोली विभागात मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पावसामुळे रेल्वे मार्ग सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे पनवेल ते दिवा 'अप' मार्गावरील वाहतूक बंद झालेली असली, तरीही दिवा ते पनवेल 'डाऊन' मार्ग सुरक्षित आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल करून गाड्यांचे नियोजन करण्यात येत आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तीन गाड्या, तर १ ऑक्टोबर रोजीच्या ९ अशा एकूण १२ गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. यात ०७१०५ पनवेल खेड मेमू, ०११५५ दिवा चिपळूण मेमू, ०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनस मंगळुरू जंक्शन या ३० ऑक्टोबर रोजी धावणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत.

तसेच ०११५६ चिपळूण दिवा मेमू, ०७१०५ पनवेल खेड मेमू विशेष, ०७१०६ खेड पनवेल मेमू विशेष, १०१०३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव (मांडवी एक्स्प्रेस), ०११७१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी विशेष गाडी २०११२ मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (कोकणकन्या एक्स्प्रेस), ११००४ सावंतवाडी दादर ( तुतारी एक्स्प्रेस), ०११७२ सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष, ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव एक्स्प्रेस या १ ऑक्टोबर रोजी धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ०७१०४ ही मडगाव ते पनवेल मार्गावर धावणारी गाडी रत्नागिरी स्थानकापर्यंत धावेल. रत्नागिरी ते पनवेल मार्ग रद्द करण्यात आला आहे. ०११७२ सावंतवाडी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस धावणारी गाडी पनवेलपर्यंत धावेल. त्यापुढील मार्गासाठी ती रद्द करण्यात आलेली आहे. ०११५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव विशेष गाडी पनवेलवरुन सुटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलपर्यंत ही गाडी रद्द केलेली आहे. ०११५४ रत्नागिरी ते दिवा मेमू विशेष कासूपर्यंत धावेल. ०११५३ ही दिवा ते रत्नागिरी गाडी कासू या स्थानकावरून सुटणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news