सिंधुदुर्ग: आरोंदा- सावरजुवा खाडीत छापा; वाळू तस्करांचे गोव्यात पलायन

सिंधुदुर्ग: आरोंदा- सावरजुवा खाडीत छापा; वाळू तस्करांचे गोव्यात पलायन

सावंतवाडी: पुढारी वृत्तसेवा : आरोंदा आणि शेर्ले या ठिकाणी वाळू तस्करांवरील कारवाईनंतर सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज (दि.३०) सकाळी सहा वाजता पुन्हा एकदा आरोंदा येथे कारवाई केली. यावेळी होडी आणि वाळू काढायचे साहित्य टाकून वाळू तस्करांनी गोव्यात पलायन केले.

तेरेखोल नदीपात्रातील भागात खाडीलगत आरोंदा सावरजुवा भागात बेकायदा घुसखोरी करून गोवा हद्दीत वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील आणि त्यांची टीम व पोलीस यंत्रणा यांना एकत्रितरित्या तेरेखोल नदी पात्रात एक होडी वाळू उपसा करत असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ या यंत्रणेने वाळू उपसा करणाऱ्या होडीचा पाठलाग केला असता सदर वाळू तस्करी करणारे गोवा हद्दीत पळून गेले.

वाळू उपसा करणारे साहित्य महाराष्ट्र हद्दीत टाकून पळाले. हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. वाळू रॅम्प व इतर साहित्य जाळून नष्ट करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपूर्वीच महसूल विभागाने अशी धडक मोहीम राबवली होती. आज पुन्हा मोहीम राबवण्यात आली.
ही मोहीम तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली दाणोलीचे तलाठी भाऊसाहेब चितारे, आरोंदा तलाठी पोले, आरोंदा उपसरपंच सुभाष नाईक, आरोंदाचे कोतवाल जाधव व पोलीस कर्मचारी दळवी उपस्थित होते.

दरम्यान, तेरेखोल नदीपात्रात परवानगी नसताना होडी कशा काय उतरतात, याबाबत मेरीटाईम बोर्डाने याकडे लक्ष देऊन पाण्यात उतरणाऱ्या होडी व बोटी यांना परवानगी आहे का ? याची तपासणी करणे आवश्यक आहे. या खाडीपात्रात गोवा भागातील तस्कर होडी उतरवत आहेत. त्यांचा पाठलाग करत असताना महाराष्ट्रातील आणि विशेषतः सिंधुर्गातील महसूल यंत्रणेकडे सुविधा आहेत. परंतु बोट चालवणारे प्रशिक्षित नाहीत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news