सिंधुदुर्ग :  जीवदान शाळेच्या विद्यार्थ्याचा फिश टॅंकमध्ये बुडून मृत्यू

सिंधुदुर्ग :  जीवदान शाळेच्या विद्यार्थ्याचा फिश टॅंकमध्ये बुडून मृत्यू

कुडाळ, पुढारी वृत्तसेवा : झाराप येथील जीवदान या शाळेत इयत्ता तिसरीत शिकणारा मुलगा साहिल नुर महंमद शेख (वय ९ , रा पिंगुळी गोंधयाळे) याचा तेथीलच फिश टॅंकमध्ये पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वा. घडली. कुडाळ तालुक्यातील झाराप येथील जीवदान या विशेष शाळेत साहिल नुर महंमद शेख हा शिक्षण घेत होता. दरम्यान शनिवारी सायंकाळी या शाळेच्या मुख्याध्यापकांनी वडिल नुर महंमद शेख यांना तुमचा मुलगा फिश टॅंकच्या पाण्यात पडला आहे असे सांगितले. त्यामुळे वडील लगेच तेथे गेले. यावेळी पाण्यात शोध घेतला असता त्याचा मृतदेह पाण्याच्या तळाशी मिळाला. यानंतर त्याला पाण्याच्या बाहेर काढले. या मुलाने आपले कपडे फिश टॅंकच्या बाहेर काढून ठेवले.

फिश टॅंकच्या भोवती असलेली लोखंडी जाळीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व यानंतर तो या फिश टॅंकच्या पाण्यात पडला अशी माहिती मुख्याध्यापक यांनी वडीलांना दिल्याचे वडीलांनी कुडाळ पोलिसांना सांगितले. यावेळी घटनास्थळी कुडाळ पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला, महिला पोलिस ममता जाधव, पोलीस सुबोध मळगांवकर यांनी भेट देत पंचनामा केला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे यांनीही घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news