जालगाव: पुढारी वृत्तसेवा: दापोली शहरातील भारत नगर येथील आयेशा महेक या इमारतीतील बंद फ्लॅट फोडून घरातील चांदीच्या दागिन्यासह मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी संशयित साकिब नासिर मुल्ला या चोरट्यास दापोली पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फराह मिन्नत टेंटवलकर आपल्या परिवारासह आयशा नामक इमारतीमध्ये राहतात. 12 ऑगस्टरोजी मुलांच्या शाळेला सुट्टी असल्याने त्या आपल्या टेटवली येथील घरी गेल्या होत्या. तिथून 16 ऑगस्टरोजी घरी परतल्यानंतर त्यांना आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असता आपल्या घरातील चांदीच्या वस्तू चोरीस गेल्याचे लक्षात आले. 17 ऑगस्टरोजी दापोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दापोली पोलिसांनी संशयित साकिब नासरी मुल्ला (वय 22, रा. रामराजे कॉलेजजवळ, दापोली) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्यांने चोरीची कबुली दिली. संशयित आरोपीने दोन दिवसांपूर्वी दापोली बाजारपेठेतील घडलेल्या चोरीतही आपणच होतो, असे कबूल केल्याचे दापोली पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा