Nilesh Rane | नारायण राणेंचा पराभव केलेल्यांचा वचपा काढणार : निलेश राणे | पुढारी

Nilesh Rane | नारायण राणेंचा पराभव केलेल्यांचा वचपा काढणार : निलेश राणे

कुडाळ : पुढारी वुत्तसेवा : ज्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पराभव केला. त्यांचा पराभव केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी शपथ भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane)  यांनी पिंगुळी येथील मेळाव्यात घेतली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर यांनी भाजप पक्षात स्वगृही प्रवेश केला.

दत्ता सामंत, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, प्रदीप माने यांच्या नेतृत्वाखाली माजी खा. निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंगुळी येथील भवानी मंगल येथे कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी विकास कुडाळकरसह माजी तंटामु्क्त समिती अध्यक्ष विष्णू धुरी व कार्यकर्ते यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. (Nilesh Rane)

यावेळी भाजप नेते दत्ता सामंत तालुका अध्यक्ष दादा साईल, संजय वेंगुर्लेकर, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, बंड्या सावंत, आनंद शिरवलकर, अॅड. बंड्या मांडकुलकर, मोहन सावंत, सरपंच अजय आकेरकर, प्रदिप माने, सागर रणसिंग, शशांक पिंगुळकर, विजय कांबळी, रुपेश कानडे, पप्या तवटे, साधना माड्ये आदी भाजप कार्यकर्त उपस्थित होते.

यावेळी नीलेश राणे म्हणाले की, आमदार वैभव नाईक यांच्याशी माझी वैयक्तिक दुष्मनी नाही. आमचा लढा विकासकामे केली नाही म्हणून आहे. सत्ता असताना एकही प्रकल्प आणला नाही. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वागीण विकास हा आमचे नेते नारायण राणे यांच्या माध्ममातून झाला आहे. विद्यमान आमदारांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाला दहा वर्षे मागे नेले आहे. त्यामुळे ज्यांनी राणेंचा पराभव केला, त्यांचा 2024 च्या निवडणुकीत पराभव करण्यासाठी भाजपचे हात बळकट करा, असे आवाहन केले.

Nilesh Rane : कुडाळचा पुढील आमदार निलेश राणेच-  सामंत

या मतदासंघाच्या विकासासाठी निलेश राणे यांना आमदार करणे हे आपले सर्वाचे काम आहे. राज्यात सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी आपण आतापासूनच कामाला लागूया. या मतदासंघात भाजप पक्षाचे उमेदवार हे निलेश राणेच असणार आहेत. माझ्यासह रणजित देसाई अन्य कोणीही निवडणूक लढविणार  नसल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले. सरपंच अजय आकेरकर संजय वेंगुर्लेकर यांनी मनोगत व्यक्त केले. मंगेश मस्के यांनी सूत्रसंचालन केले. दत्ता पाटील यांनी प्रास्तविक केले.

हेही वाचा 

Back to top button