रायगड : कशेडी घाटात गॅस वाहतूक करणारा टँकर पेटला | पुढारी

रायगड : कशेडी घाटात गॅस वाहतूक करणारा टँकर पेटला

पोलादपूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना शनिवारी (दि.२९) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, टँकर चालक दत्ता भोसले हा आपल्या ताब्यातील टँकर चालक दत्ता भोसले हा खोपोली ते जयगड असा घेऊन जात असता कशेडी घाटातटॅंकरने शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पेट घेतला. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

चालक सुखरुप असून कशेडी व पोलादपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही बाजूची वाहतूक थांबवली आहे. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. हा जाणारा टँकर टाकी रिकामी असल्याचे चालकाने माहिती देताना सांगितले. मात्र,  सदरची घटना येलंगेवाडी गावाजवळ असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून येलंगेवाडी येथील सर्व नागरिकांना पार्टेवाडी येथे हलवण्यात आले आहे. येथील नागरिकांचा धोका टळला असला तरी मात्र कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button