रत्नागिरी : माजी खासदार ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे निधन | पुढारी

रत्नागिरी : माजी खासदार ॲड. बापूसाहेब परुळेकर यांचे निधन

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा : कोकणातील प्रख्यात कायदेतज्ञ व माजी खासदार ॲड. बापूसाहेब परुळेकर (वय ९४) यांचे आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. जनता पार्टीचे खासदार म्हणून बापूसाहेब हे लोकसभेवर दोन वेळा निवडून गेले होते.

बापूसाहेब परुळेकर हे १९६० ते १९७० पर्यंत रत्नागिरी जिल्हा जनसंघाचे जिल्हा अध्यक्ष होते. रत्नागिरी जिल्हा संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते १९५७ ते ६० च्या काळात चेअरमन होते. व्हाईस चेअरमन आणि प्रेसिडेंट म्हणून अनेक एज्युकेशन आणि सांस्कृतिक संस्थांचे, शाळांचे त्यांनी काम पाहिलेले आहे. प्रमोटर मेंबर म्हणून रत्नागिरी जिल्हा रोटरी क्लबचे ते मेंबर होते. पोस्टल ॲडव्हायझर कम्युनिटी फॉर महाराष्ट्र स्टेटचे १९७८ ते ७९ पर्यंत त्याचप्रमाणे रेल्वे युजर कम्युनिटी सेंट्रल झोनचे अॅग्रीकल्चर कौन्सिलर डेव्हलपमेंट सर्कल यासारख्या अनेक संस्थांवर सामाजिक सांस्कृतिक आणि राज्यस्तरीय कमिटी, समित्यांवर ते अध्यक्ष होते.

 

Back to top button