रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला | पुढारी

रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला

रत्नागिरी ः जिल्ह्यात गुरुवारी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला असताना पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी टप्प्या-टप्प्याने हजेरी लावत होत्या. मात्र, गुरुवारी सायंकाळी पावसाचा जोर वाढला.

दोन दिवस पावसाने पाठ फिरविली असताना गुरुवारी सकाळी जोरदार सरी झाल्या. मात्र, त्यामध्ये सातत्य नव्हते. गुरुवारी संपलेल्या 24 तासांत जिल्ह्यात 17.56 मि.मी. च्या सरासरीने 158 मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड 29 मि.मी., दापोली 31 मि.मी., खेड 12 मि.मी., गुहागर 9 मि.मी., चिपळूण 16 मि.मी., संगमेश्वर 34 मि.मी., रत्नागिरी 8, लांजा 14 आणि राजापूर तालुक्यात 5 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत पावसाने एकूण 9 हजार मि. मी. ची मजल गाठली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार मि.मी. च्या सरासरीने पाऊस झाला.

Back to top button