उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर राज ठाकरेंचे मिश्किल हास्य

उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीवर राज ठाकरेंचे मिश्किल हास्य

चिपळूण: पुढारी वृत्तसेवा: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र यावे, अशी मागणी शिवसैनिक आणि मनसैनिक करू लागले आहेत. या मागणीबाबतचे फलकही त्यांच्याकडून ठिकठिकाणी लावले जात आहे. परंतु, यावर ठाकरे बंधूंनी मौन बाळगणे पसंत केले आहे. चिपळूण दौऱ्यावर आज (दि.१३) आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र येणार का ? या प्रश्नावर मिश्किल हास्य करत उत्तर देणे टाळले.

राज ठाकरे दोन दिवस कोकणात आहेत. आगामी मुंबई महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीचे सत्र सुरू केले आहे. आज सकाळी त्यांनी चिपळूण येथे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लवकरच मेळावा घेणार आहे. तेव्हा बोलू. मात्र, आता संघटनात्मक बांधणीसाठी आलो आहे. या नंतर राज- उद्धव एकत्र येणार का ? या प्रश्नावर त्यांनी जोरदार हास्य केले. त्यामुळे त्यांच्या हास्यातून नेमका काय अर्थ काढायचा असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news